मुले-मुली वयात येत असताना उद्भवणारी मोठी समस्या

  मुले-मुली वयात येताना किंवा आल्यावर शरीरीतील हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात. 

Updated: Apr 11, 2019, 11:41 AM IST
मुले-मुली वयात येत असताना उद्भवणारी मोठी समस्या title=

मुंबई : मुले-मुली वयात येत असताना किंवा वयात आल्यावर चेहऱ्यावर मुरूम येतात. चेहऱ्यावर येणारे मुरूम, पिंपल्स घालवण्यासाठी मुली सर्सार सौदर्यप्रसाधनांचा वापर करतात. मुली त्यांच्या चेहऱ्याची विशेष काळजी घेतात. सध्याच्या काळात मुलेही त्यांच्या चेहऱ्याबद्दल काळजी घेताना दिसतात. वयात येताना किंवा आल्यावर शरीरीतील हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात. वयात येताना किंवा वयात आल्यानंतर चेहऱ्यावर मुरूम येत असतील तर मुला-मुलींना त्याची लाज वाटते. किंबहुना त्यामुळे बरेचदा न्यूनगंड निर्माण होतो. 

चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी घरगुती उपाय
- चेहरा नियमित तीन ते चार वेळा कोमट मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवावा.

- चेहऱ्याला कडूलिंबाचा रस लावावा. १५ मिनिटांनंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. केसात कोंडा होवू नये याची पुरेपुर काळजी घ्या.

-चेहऱ्यावर मुरूमं येण्याचा त्रास अनेक महिलांना असतो अशावेळी कच्च्या पपईचा रस किंवा छोटीशी फोड करून ती चेहऱ्यावर लावावी. पपई खाल्ल्यास फरक जाणवू लागतो, करण पपईमुळे रक्तशुद्ध होते. पोट साफ असेल, पचनशक्ती चांगली असेल तर साहजिक बाह्यरुपही खुलून दिसते.

- काकडी सुद्धा चेहऱ्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. काकडीचा कीस नियमितपणे चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्या, सुरुकुत्या दूर होऊन चेहरा उजळतो.

-डोळ्याभोवती काळी वर्तुळे आसतील तर बटाटे कुसकरून डोळ्याभोवती लावा, त्यामुळे काळे डाग कमी होतात.

- काकडीचा रस आणि मध यांचे मिश्रण चेहऱ्यास लावल्यावर मुरूमची समस्या कमी होते.

-टॅनिग काढण्यासाठी गुलाबपाणीही तितकंच फायदेशीर ठरते. दिवसातून किमान दोन वेळा गुलाबपाणी चेहऱ्यावर लावल्यास आठवड्याभरात लगेच फरक जाणवू लागतो. 
    
नियमित आहारात पालेभाज्या, सालासकट फळे, कडधान्ये खावीत. रोज भरपूर व्यायाम करावा. हे सर्व केल्याने आपली त्वचा निरोगी व तेजस्वी राहते. चेहऱ्यावरील मुरुमे फोडू नयेत, नाहीतर त्यात जंतूलागण होते. मुरुमे जास्त असतील तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जाहिराती पाहून मलमे, साबण वापरू नये. त्याने अपाय होण्याची शक्यता जास्त असते.