ही मालिका तब्बल 9 वर्षानंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला...

मराठी टीव्हीविश्वात अनेक नवीन मालिका, रिअॅलिटी शो (reality show) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

Updated: Oct 13, 2022, 07:12 PM IST
ही मालिका तब्बल 9 वर्षानंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला... title=
zee marathi popular comedy show fu bai fu will be start soon nz

Fu Bai Fu Tv show : प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी छोट्या पडद्यावर अनेक मालिका येत असतात. अनेक माध्यामांतून या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन (Entertainment) करायला सज्ज असतात. या वर्षी देखील टिव्ही (TV) वर अनेक मालिका येणार आहेत. त्यात अनेक मालिकांचे रिमेक (Remake), सिक्वेल (sequel) दिसणार आहेत. यावेळेस मनोरंजनाचा डबल तडका टिव्ही वर पाहायला मिळणार आहे. (zee marathi popular comedy show fu bai fu will be start soon nz)

आणखी वाचा - उर्फी जावेद पुन्हा त्याचाच प्रेमात? इन्स्टाग्रामवर उघड केलं प्रेम

 

मराठी टीव्हीविश्वात अनेक नवीन मालिका, रिअॅलिटी शो (reality show) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात डान्स शो (Dance show), कॉमेडी शो (Comedy Show) अशी यादी असली तरी, काही असे जुने आणि प्रसिद्ध शोज आहेत, ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम 'फू बाई फू' (Fu Bai Fu) हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

तुम्हाला माहित असेलच 'फू बाई फू' या कार्यक्रमाचे १४ भाग प्रदर्शित झाले होते तब्बल नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा कॉमेडीचा तडका प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या मालिकेत जुन्या कलाकारांचा वावर पाहायला मिळणार आहे तसेच नवीन कलाकार ही आपल्या कॉमेडीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. 

आणखी वाचा - Diwali 2022: दिवाळीत या 3 लक्ष्मी मंदिरांना द्या भेट , होईल तुमची भरभराट

 

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठीतील आघाडीची अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) करणार असून परिक्षणाची जबाबदारी कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) आणि उमेश कामत (Umesh kamat) करणार आहेत. या कार्यक्रमात हास्याची धमाल उडवून देणारे कलाकार कोण असणार आहेत याच्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. "फु बाई फू" ३ ही मालिका नोव्हेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त  झी मराठीवर.