नावामुळे झाकीर हुसैन यांना अमेरिकेत रोखून विचारला 'हा' प्रश्न; पत्नीने दिलेलं उत्तर महत्त्वाचं....

Zakir Hussain : झाकीर हुसैन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालं. झाकीर हुसैन यांचे चाहते त्यांचे वेगवेगळे किस्से आणि आठवणी जाग्या करत आहेत. अशातच झाकीर हुसेन यांचा एक अतिशय रोमांचक किस्सा चर्चेत आला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 16, 2024, 02:38 PM IST
नावामुळे झाकीर हुसैन यांना अमेरिकेत रोखून विचारला 'हा' प्रश्न; पत्नीने दिलेलं उत्तर महत्त्वाचं....  title=

Zakir Hussain : तबल्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगभरात पसरवण्याचं काम झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे. 73 व्या वर्षी अमेरिकेत शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रातून अनेक दिग्गज व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. झाकीर हुसैन यांचे भारतीय शास्त्रीय संगीतात अनन्यसाधारण प्राविण्य होते. झाकीर हुसैन यांचे रविवारी 15 डिसेंबर रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे निधन झाले.

भारतीय संस्कृतीचे राजदूत 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूचे कारण इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस (क्रोनिक लंग डिसीज) असल्याचे सांगण्यात आले. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने जागतिक संगीतातील एका युगाचा अंत झाला. त्यांची असाधारण कारकीर्द सुमारे सहा दशके पसरली, ज्या दरम्यान त्यांनी तबला हे भारतीय शास्त्रीय संगीतातील सहायक वाद्यातून जगासमोर आणले. आपल्या कलेसाठी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीसाठी ओळखले जाणारे, हुसेन हे केवळ कलाकारच नव्हते तर एक सांस्कृतिक राजदूत देखील होते ज्यांनी पारंपारिक भारतीय ताल आणि जागतिक संगीत शैली यांच्यातील अंतर कमी केले.

दिग्गजांसोबत केलंय काम 

9 मार्च 1951 रोजी मुंबईत जन्मलेल्या झाकीर हुसैन यांचा जन्म प्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्ला रखा यांच्या पोटी झाला. लहानपणापासूनच त्यांनी तबल्याबद्दल विलक्षण आत्मीयता वाटत होती आणि त्यापद्धतीने त्यांनी काम देखील केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, उस्ताद झाकीर हुसेन यांनी पारंपारिक भारतीय आणि जागतिक संगीत दोन्हीमध्ये काही प्रतिष्ठित नावांसह काम केले आहे. पंडित रविशंकर आणि उस्ताद विलायत खान यांसारख्या दिग्गजांसह त्यांनी काम केले.

झाकीर हुसैन यांना मिळालेला सन्मान

झाकीर हुसैन यांच्या संगीतातील योगदानाला भारत सरकारकडून पद्मश्री (1988) आणि पद्मभूषण (2002) तसेच चार ग्रॅमी पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी ओळखले गेले आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील त्यांचे प्रभुत्व संगीत नाटक अकादमी पुरस्काराने ओळखले गेले आणि 2014 मध्ये त्यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप, युनायटेड स्टेट्समधील पारंपारिक कलाकारांसाठी सर्वोच्च सन्मान देण्यात आला.

झाकीर हुसैन यांना इमिग्रेशनला थांबला

झाकीर हुसैन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अनेक जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये झाकीर हुसैन त्याच्यासोबत घडलेल्या एका रंजक घटनेबद्दल सांगत आहेत. झाकीर हुसैन म्हणाले, 'मला आठवतं की मी एकदा सॅन फ्रान्सिस्कोमध्ये इमिग्रेशनला गेलो होतो, तेव्हा माझ्या दिसण्यामुळे, नाव आणि पासपोर्टमुळे मला बाजूला उभं केलं गेलं होतं. काही वेळाने मला बूथवर बोलावून विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले.

झाकीर हुसैन यांना विचारला अनोखा प्रश्न

यादरम्यान झाकीर हुसैन यांना तुम्ही काय करता, असा प्रश्नही विचारण्यात आला. यानंतर त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही रविशंकर यांना ओळखता का? याला उत्तर देताना झाकीर हुसैन म्हणाले की, हो मी त्यांना ओळखतो. यानंतर झाकीर हुसैन सांगतात की, त्यांनी मला विचारले की, 'भारतातील रविशंकर यांच्यानंतर दुसरा महान संगीतकार कोण आहे?' या प्रश्नाचे उत्तर माझ्या पत्नीने दिल्याचे झाकीर हुसैन सांगतात. त्याची बायको म्हणाली, 'हे गुगलवर सर्च कर.'