मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडिया खूप चर्चा झाली. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून नवीन काही मुद्दे समोर आणले आहेत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात यशराज फिल्मशी संबंधित एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
यशराज फिल्मचे माजी प्रमुख आशीष सिंह यांचं देखील स्टेटमेंट देखील घेतली आहे. यानंतर आता कास्टिंग दिग्दर्शक वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. YRF चे माजी हेड आणि आताचे नेटफ्लिक्सचे दिग्दर्शक आशीष सिंहने सांगितलं की,'कॉन्ट्रॅक्ट तोडून सुशांत सिंह राजपूत गेला नाही. खूप चांगल्या पद्धतीने सुशांत गेला होता. आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. ही पाच वर्षांपूर्वीपासूनची गोष्ट आहे.'
आशीष यांनी सांगितलं की, पोलिसांनी त्यांना कॉन्ट्रॅक्ट बद्दल जाणून घेण्यासाठी बोलवल होतं. काही सिनेमे वर्क आऊट होत नाहीत. सुशांतने दोन सिनेमे YRF सोबत केली होती. मात्र आशीष यांनी तिसऱ्या सिनेमाच्या दबावाबद्दल काहीच सांगितलं नाही. पोलिसांनी आज आशीष सिंह यांचा जबाब नोंदवला आहे.
सुशांतचा तिसरा सिनेमा का तयार होऊ शकला नाही? यावर अखेर आशीष सिंहने मौन सोडलं. आशीष सिंहने सुशांत सिंह राजपूतने यशराजच्या टॅलेन्ट मॅनेजमेंट कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायला लावलं. आशीष सिंहने पुढे सांगितलं की,'कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलं मात्र ते वेगळे का झाले? मला माहित नाही.' सुशांतला तिसरा सिनेमा का मिळाला नाही? याचं उत्तर आशीष सिंहने काहीच कारण नव्हतं? असं सांगितलं.