Urfi Javed : इन्स्टाग्रामने का मागितली उर्फी जावेदची माफी? पाहा नेमकं काय झालं?

Uorfi Javed Instagram :  उर्फी जावेदचं इन्टाग्राम अकाऊंट सस्पेंड (Instagram Account Suspended) केल्याची माहिती समोर आली आहे. उर्फीने स्वत: इन्स्टाग्राम अकाउंटचा स्क्रीनशॉट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली.

सौरभ तळेकर | Updated: Dec 3, 2023, 05:12 PM IST
Urfi Javed : इन्स्टाग्रामने का मागितली उर्फी जावेदची माफी? पाहा नेमकं काय झालं? title=
Urfi Javed Instagram Account

Urfi Javed Instagram Account Suspended : बिग बॉस फेम आणि मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अंतरंगी फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी सतत तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक बोल्ड व्हिडिओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांसाठी अपडेट देत असते. अशातच आता उर्फी जावेदचं इन्टाग्राम अकाऊंट सस्पेंड केल्याची माहिती समोर आली आहे. उर्फीने स्वत: इन्स्टाग्राम अकाउंटचा ( Urfi Javed Instagram ) स्क्रीनशॉट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली होती. त्यानंतर तासाभरातच काय झालं पाहा...

उर्फी जावेदचे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड करण्यात झाल्याने अभिनेत्रीने स्वतः त्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर तो स्क्रीनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. उर्फीच्या चुकीच्या पद्धतीने वागत असून समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं जात असल्याचं इन्स्टाग्रामने म्हटलं होतं. त्यानंतर उर्फीने इन्स्टाग्रामशी संपर्क साधल्यानंतर इंस्टाग्राम अकाउंट तिच्या टीमने अॅक्टिव्ह करत पुन्हा चालू केलंय.

चुकून उर्फीचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं. अकाऊंट पुन्हा रिअॅक्टिव करण्यात आलं आहे. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असा मॅसेज इन्स्टाग्रामकडून उर्फीला पाठवण्यात आला आहे.

उर्फी जावेद म्हटलं की सर्वांत आधी डोळ्यांसमोर तिचे चित्रविचित्र कपडे आणि फॅशनच येतं. उर्फी आणि अजबगजब फॅशन हे जणू समीकरणच बनलं आहे. म्हणूनच तिला साध्या कपड्यांमध्ये पाहिलं की नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. उर्फीला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा ट्रोल केलं गेलंय. पण कुठल्याही ट्रोलिंगला न जुमानता उर्फी अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान करताना दिसते.