VIDEO : कोण आहे प्रियांका हलदर? लाइव्ह शोमध्ये मित्रानेच कापला अभिनेत्रीचा नवाकोरा ड्रेस, अन् मग...

India's Got Latent : समय रैनाच्या शोमध्ये एका अभिनेत्रीचा आपला नवा कोरा ड्रेस मित्रानेच कात्रीने कापून टाकला. लाइव्ह शोमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

नेहा चौधरी | Updated: Dec 10, 2024, 07:42 PM IST
VIDEO : कोण आहे प्रियांका हलदर? लाइव्ह शोमध्ये मित्रानेच कापला अभिनेत्रीचा नवाकोरा ड्रेस, अन् मग... title=
india got latent

Who Is Priyanka Haldar : आजकाल ' इंडियाज गॉट लेटेंट ' हा शो खूप प्रसिद्ध होतोय. कधी पूनम पांडे, कधी अविका गौर तर कधी भारती सिंह या शोमध्ये जज म्हणून खुर्चीवर बसल्या आहेत. या शोमधील दुहेरी अर्थाचे विनोद म्हणजे अश्लील बोलणे तरुण पिढीला खूप आवडत आहेत. या शोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत आहेत. या शोमध्ये लाइव्हदरम्यान एका अभिनेत्री आणि तिच्या मित्राचं कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झालंय. त्यानंतर ही अभिनेत्री ट्रोल झाली आहे. लाइव्ह शोदरम्यान लाल रंगाचा नवीन ड्रेस अभिनेत्रीने घातला होता. तिचा मित्र स्टेजवर आल्यावर त्याने या अभिनेत्राचा ड्रेस कात्रीने कापला अन् हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोण आहे ही अभिनेत्री?

प्रियांका हलदर असं या अभिनेत्रीचं नाव आहे. प्रसिद्धच्या नावाखाली केलेल्या या कृत्यानंतर सोशल मीडियावर ती प्रचंड ट्रोल झाली आहे. स्टेजवर तिच्या मित्राने ज्या पद्धतीने ड्रेस कट करून आपले कौशल्य दाखवले ते पाहून केवळ जज नाही तर जनतेलाही आश्चर्यचकित झाले. या आश्चर्याचं कारण म्हणजे प्रियांका हलदर ज्या मुलासोबत हे धाडसी कृत्य करताना दिसली तो तिचा प्रियकर नसून फक्त एक मित्र आहे. इतकंच नाही तर प्रियांका हलदर आधीच विवाहित असून तिला 15 वर्षांचा मुलगाही आहे. 

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रियंका हलदरच्या पतीला 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या स्टेजवर मित्राकडून तिचा ड्रेस कट केला जात असल्याची कल्पना नव्हती. हे सर्व ऐकून आता लोक तिच्यावर पतीला फसवणूक केल्याचा आरोप करत आहेत. सोशल मीडियावर प्रियांका हलदरवर अनेक मीम बनवले जात आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे प्रियांका हलदर आहे तरी कोण? 

कोण आहे प्रियंका हलदर?

प्रियांका हलदर ही 33 वर्षांची अभिनेत्री असून तिचा जन्म बंगालमध्ये झाला

ती सध्या कामासाठी मुंबईत राहते.

प्रियांकाने 12 वी पर्यंत शिक्षण घेतलं असून लहान वयातच लग्न झालं.

प्रियांकाने वयाच्या 18 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला, त्याच वय 15 वर्षांचा आहे.

प्रियांकाचा नवरा भारतीय रेल्वेत काम करतो आणि तो सध्या नागपुरात राहतो.

प्रियांका हलदरने क्राइम पेट्रोल, उठा पाटाक 4 (ALTT) आणि डीडी नॅशनल वरील काही कार्यक्रमांसह अनेक टीव्ही शोमध्ये काम केलंय.

इंस्टाग्रामवर प्रियांकाचे 14,500 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शोचा 11 वा भाग यूट्यूबवर ट्रेंडिंग नंबर 1 आहे. या एपिसोडमध्ये दोन विजेते होते - अनमोल शर्मा, ज्याने नेत्रदीपक बेली डान्स परफॉर्मन्स दिला आणि कुशल भानुशाली, जो एक अंध स्टँड-अप कॉमेडियन आहे. प्रियंका हलदरचे हे कृत्य शोचा एक मजेदार भाग असला तरी, सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली आहे.