अनुष्का शर्मा वडिलांना जे शेअर करायची याची तुम्ही कल्पनाही केली नसेल; कारगिल युद्धाचे दिवस आठवत अनुष्का शर्मा भावूक

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Updated: May 1, 2022, 05:18 PM IST
अनुष्का शर्मा वडिलांना जे शेअर करायची याची तुम्ही कल्पनाही केली नसेल; कारगिल युद्धाचे दिवस आठवत अनुष्का शर्मा भावूक title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा रवीवारी तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येत जन्मलेल्या अनुष्का शर्माचं बालपण आसाम आणि कर्नाटकमध्ये गेलं. अनुष्का शर्माचे वडील अजय कुमार शर्मा हे आर्मी ऑफिसर होते आणि त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक महत्त्वाचा स्थान मिळाल्याचं ते सांगतात. 1982 नंतर तिच्या वडिलांनी अनेक युद्धं लढल्याचं अनुष्का शर्माने अनेकदा सांगितलं आहे. कारगिल युद्धही त्यांनी लढलं.

जेव्हा कारगिल वेळी बाबा फोन करायचे
2012 मध्ये एका मुलाखतीत अनुष्का शर्मा म्हणाली, 'कारगिलचा टप्पा खूप कठीण होता. तेव्हा मी खूप लहान होते पण आईला पाहून भीती वाटायची. ती दिवसभर न्यूज चॅनेल बदलत असे आणि मृत्यूची नोंद झाल्यावर ती खूप अस्वस्थ व्हायची. जेव्हा माझे वडील फोन करायचे तेव्हा ते जास्त बोलू शकत नव्हते आणि मी त्यांना माझी शाळा, बॉयफ्रेंड आणि मी त्यांना सगळं काही सांगत बसायचे. तिथे ते माझ्यासोबत जास्त बोलू शकत नव्हते हे पण मी विसरुन जायचे

'मी आर्मी ऑफिसरची मुलगी आहे - अनुष्का'
अनुष्का शर्मा पुढे म्हणाली की, ती माझ्या वडिलांच्या खूप जवळ आहे आणि त्यांना सगळं काही शेअर करते जे ती इतर  कोणाशीही शेअर करू शकत नाही. अनुष्का शर्मा पुढे म्हणाली, 'मी एक अभिनेत्री आहे हे सांगण्यापेक्षा मी एका आर्मी ऑफिसरची मुलगी आहे हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो.' वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अनुष्का शर्मा सध्या Chakda Xpress या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.