मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. प्रियांकाने तिच्या नवीन-नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. नुकतेच प्रियांकाने असे काही फोटो शेअर केले आहेत जे पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. पोस्टमध्ये, 'देसी गर्ल' स्विमिंग पूलमध्ये तिचा क्लालिटी टाइम एन्जॉय करतेय. प्रियांकाने क्लिक केलेल्या फोटोत ती पूल साईडला स्विमसूटमध्ये तिची फिगर फ्लाँन्ट करताना दिसते.
तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, प्रियांकाने सरोगसीद्वारे जानेवारी महिन्यात बाळाला जन्म दिला. तीन महिन्यांनंतर प्रियांकाच्या बाळाचं नाव समोर आलं, मात्र या नावामागेही खूप काही दडलंय.
प्रियांकाच्या घरी सरोगसीद्वारे मुलीचं आगमन झालं. प्रियांकाने मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनास असं ठेवल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. मात्र प्रियांकाने हे नाव का ठेवलं त्याचं कारण आता समोर आलं आहे.
प्रियांकाच्या आईचं नाव आहे मधुमालती चोप्रा. अनेक वेळा प्रियांका आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आईसोबत प्रियांकाचं नातं खूप खास आहे. त्यामुळे आईच्या नावातलं 'मालती' हे नाव आणि निक ख्रिश्चन असल्याने मेरी हे नाव जोडत 'मालती मेरी' असं नाव प्रियांकाने आपल्या मुलीला दिलं आहे.