'वडिलांसारखं होऊ नकोस, स्वत:ला...' सनी देओलच्या लेकाला धर्मेंद्र यांचा सल्ला

Sunny Deol Rajveer Deol: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलच्या लेकाची. राजवीर देओल हा लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीतून पदार्पण करतो आहे. यावेळी त्याच्या ट्रेलर लॉन्चला धर्मेंद्रही उपस्थित होते. सनी देओलच्या लेकाला राजवीर देओलला दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 5, 2023, 06:13 PM IST
'वडिलांसारखं होऊ नकोस, स्वत:ला...' सनी देओलच्या लेकाला धर्मेंद्र यांचा सल्ला  title=
when dharmendra gave rajveer deol a suggestion on not to become like his father

Sunny Deol Rajveer Deol: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओल यांची. 'गदर 2' यशस्वी झाल्यानं सर्वत्र त्याचीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी सनी देओलच्या मुलाचीही चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यांच्या मोठ्या मुलाचे करणचे नुकतेच लग्न झाले आहे. त्यामुळे त्याचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यातून करणनंही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. चार वर्षांपुर्वी त्यानं 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून भुमिका केली होती. हा त्याचा पहिला चित्रपट होता सोबतच त्यानं या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर तो 'वल्ले' या चित्रपटातून दिसला होता. त्याचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी झाले नव्हते परंतु या चित्रपटांची चर्चाही चांगलीच रंगलेली होती. आता सनी देओलचा दुसरा मुलगा राजवीर देओल हा देखील आता बॉलिवूडमधून पदार्पण करणार आहे. त्यामुळे त्याचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता त्याच्या 'दोनो' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी देओल कुटुंबियही उपस्थित होते. 

यावेळी धर्मेंद्र यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाची चांगली चर्चा रंगलेली आहे. घराणेशाहीवर अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं. त्यामुळे बॉलिवूडमध्ये त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आपल्या टेलेंटनं सनी देओल आणि बॉबी देओल यांनी स्वत:ला सिद्ध केले असले तरीसुद्धा धर्मेंद्र यांची चारही मुलं ही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. आहना देओल तितकीशी सक्रीय नाही. परंतु ईशा देओल, सनी देओल, बॉबी देओल हे पुर्णवेळ फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहेत त्यातून आता सनी देओलची दोन्ही मुलंही ही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. करण देओलनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे तर आता सनी देओलचा धाकटा मुलगाही बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. 

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहत स्माईल करणारा 'हा' गोड मुलगा कोण? ओळखलंत का...

यावेळी ट्रेलर लॉन्चला सनी, बॉबी आणि करणही उपस्थित होते. त्यावेळी राजवीरला प्रश्न विचारण्यात आला होता. आजी आजोबांनी इंडस्ट्रीत येण्यापुर्वी तुला कोणता सल्ला दिला? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला की, ''मी या क्षेत्रात पदार्पण करतोय हे पाहून त्यांना फार आनंद झाला. तुझं व्यक्तिमत्त्वं चांगलं आहे. त्यामुळे वडिलांची प्रतिमा फॉलो करू नकोस. त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करू नकोस. स्वत:ला सिद्ध कर. तुझ्यावर खूप चांगले संस्कार झाले आहेत. त्यामुळे आजोबा आणि काकासारखा होऊ नकोस'', असा सल्ला दिला. 

धर्मेंद्र यांचा नातू, सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल हा लवकरच 'दोनो' या चित्रपटातून लवकरच पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर राजवीरच्या डेब्यू चित्रपटाची घोषणा सनी देओल, बॉबी देओल आणि सर्वच देओल कुटुंबियांनी केली होती. त्यामुळे तेव्हाही त्याचीच चर्चा होती. आता शेवटी त्याच्या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.