Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी देखील अमीषा चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसते. अमीषानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आणि विक्रम भट्ट यांच्यात असलेल्या नात्याविषयी बोलताना त्या गोष्टीचा तिच्या करिअरवर कसा परिणाम झाला याविषयी सांगितले आहे.
खरंतर अमीषाच्या या मुलाखतीनंतर विक्रम भट्ट यांनी एक मुलाखत समोर आली आहे. त्या मुलाखतीत विक्रम भट्ट म्हणाले होते की 'अमीषा आणि मी एकत्र वाईट काळ पाहिला. मात्र जेव्हा आमचा चांगला काळ सुरू झाला, तेव्हा दुर्दैवाने आम्ही सोबत नव्हतो. माझे एका पाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप होत होते. तीसुद्धा तिच्या करिअरमध्ये खूप संघर्ष करत होती. अखेर 1920 या माझ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी आमचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर माझे 'शापित' आणि 'हाँटेड'सारखे चित्रपट प्रदर्शित झाले.'
पुढे विक्रम भट्ट म्हणाले की, 'मी अमीषाचा संघर्ष पाहिला आहे. तिने कहो ना प्यार है, गदर, हमराजसारखे हिट चित्रपट दिले. मात्र, काही काळानंतर इतर अभिनेत्री तिच्या पुढे निघून गेल्या. मी सुद्धा बऱ्याच दिग्दर्शकांना माझ्या मागून येऊन पुढे जाताना पाहिलं. त्यामुळे आम्ही दोघांनी कठीण काळाचा सामना केला आहे. म्हणून मी तिचं दु:ख समजतो. तिच्यासाठी स्टारडम गमावणं ही खूप मोठी गोष्ट होती.'
विक्रम यांनी पुढे सांगितलं होतं की अमीषाला कुणाल कोहलीच्या थोडा प्यार, थोडा मॅजिक या चित्रपटापासून आशा होत्या. त्या चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जी होते. पण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. त्या गोष्टीचा तिला खूप जास्त त्रास झाला होता.
हेही वाचा : अभिनेत्रीचा स्वत: ला संपवण्याआधी आईला व्हिडीओ कॉल, पतीविषयी धक्कादायक खुलासा
अमीषा तिच्या रिलसेश म्हणाली होती, 'या इंडस्ट्रीत प्रामाणिकपणाला कोणतीच जागा नाही आणि मी सर्वांत प्रामाणिक व्यक्ती आहे. माझ्या मनात जे असतं तेच माझ्या चेहऱ्यावर दिसतं. पण हाच माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा ड्रॉबॅक ठरला आहे. निश्चितपणे मी फक्त ज्या दोन रिलेशनशिप्समध्ये होती आणि ज्याविषयी मी जाहीरपणे व्यक्त झाले, त्यांचाच माझ्या करिअरला मोठा फटका बसला. आता गेल्या 12-13 वर्षांपासून माझ्या आयुष्यात कोणीच नाही. फक्त शांतता आहे. मला माझ्या आयुष्यात दुसरं काहीच नकोय.'