'घरी बसल्यावर कमाई कशी होणार?'; अभिषेक बच्चनच्या प्रश्नाला ऐश्वर्याने दिलं होतं 'हे' उत्तर, हे बघ...'

Abhishek Bachchan Aishwarya Rai: अभिषेक बच्चनने आपल्या एका जुन्या मुलाखतीत कोविडदरम्यान आपल्या मनात नेमकं काय सुरु होतं याचा खुलासा केला होता. कोविड झाल्यानंतर अभिषेक बच्चन जवळपास एक महिना रुग्णालयात होता. घऱी आल्यानंतर तो पत्नी ऐश्वर्याला असं काही बोलला होता ज्याचं उत्तर ऐकल्यानंतर त्याला मोठी शिकवण मिळाली.   

शिवराज यादव | Updated: Jun 11, 2024, 07:30 PM IST
'घरी बसल्यावर कमाई कशी होणार?'; अभिषेक बच्चनच्या प्रश्नाला ऐश्वर्याने दिलं होतं 'हे' उत्तर, हे बघ...'  title=

Abhishek Bachchan Aishwarya Rai: बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचंही नाव आवर्जून घेतलं जातं. पण अभिषेक आणि ऐश्वर्या इतर बॉलिवूड किंवा सेलिब्रिटी कपल्सप्रमाणे आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाहीर करत नाहीत. ते आपल्या खासगी आयुष्याबद्दल फार काळजी घेतात. इतरांप्रमाणे ते कपल गोल्स दाखवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. याशिवाय दोघेही एकमेकांना खासगी आयुष्य आणि करिअर अशा दोन्ही आघाड्यांवर मदत करत असतात. अभिषेक बच्चनने आपल्या एका जुन्या मुलाखतीत कोविडदरम्यान ऐश्वर्याने आपल्याला दिलेल्या एका सल्ल्यामुळे कशाप्रकारे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला याची माहिती दिली होती. 

अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) राज शमानींना दिलेल्या मुलाखतीत, कोविडदरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला होता. आपण रुग्णालयातून परतल्यानंतर ऐश्वर्या रायने त्याला एक आनंदी कुटुंब सोबत असणं जास्त महत्वाचं असल्याचं सांगितलं होतं. 

अभिषेक बच्चनने सांगितलं होतं की, “तुम्ही परत येऊ शकता आणि एखाद्या गोष्टीबद्दल नाराज होऊ शकता. तुम्हाला माहिती आहे की आजकाल तुम्ही मुंबईत असाल तर तुम्हाला ट्रॅफिकचाही त्रास होतो. आणि कधी कधी ती म्हणते, 'तू इतका हायपर का होत आहेस?' शांत हो, आयुष्यात आणखीही महत्त्वाच्या गोष्टी आहेत? तुम्ही घरी आला आहात आणि तुमच्याकडे एक निरोगी, आनंदी कुटुंब आहे".

अशाच आणखी एका आठवणीला उजाळा देताना त्याने सांगितलं की, "मला आठवतं की एकदा तिने मला असं काही सांगितलं होतं ज्याच्या माझ्यावर फार प्रभाव पडला. हा कोविड-19 चा काळ होता. माझे वडील, माझी पत्नी, माझी मुलगी आणि मी सर्व एकाच वेळी रुग्णालयात होतो. हळूहळू एकामागून एक डिस्चार्ज होत होते. घरी येणारा मी शेवटचा माणूस होतो. मी जवळजवळ महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहिलो आणि जेव्हा मी घरी परतलो. ऐश्वर्या म्हणाली, 'तुम्हाला माहिती आहे का, आपण किती भाग्यवान आहोत की आपण सगळे अजूनही इथे आहोत. कोविडमुळे उद्ध्वस्त झालेली अनेक कुटुंबं आहेत. आपण खूप भाग्यवान आहोत आणि हीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यावर मी म्हटलं होतं की, 'तू अगदी योग्य आहेस, कारण मी विचार करत होतो की घऱीच बसून आहोत, काहीच काम करत नाही आहोत, पैसे कसे कमवायचे?'. त्यावर ऐश्वर्या म्हणाली होती, 'तुमच्याकडे एक निरोगी कुटुंब आहे. यापेक्षा अधिक तुम्हाला काय हवं?".

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं 2007 मध्ये लग्न झालं होतं. 2011 मध्ये त्यांच्या घऱी एकुलती एक मुलगी आराध्याचं आगमन झालं.