बॉलिवूडमध्ये अनेक असे किस्से आहेत, ज्याबद्दल आजही चाहत्यांना माहिती नाही. त्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं. एकेकाळी इंडस्ट्रीचा शोमन राज कपूर यांच्याबद्दल अफवा पसरली होती. त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधाबद्दल मीडियामध्ये अनेक बातम्या यायच्या. राज कपूरसोबत त्या काळात अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेले. यातील सर्वाधिक चर्चा रंगली ती राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्रेमकहाणीची.
राज कपूर आणि नर्गिस यांची भेट झाली तेव्हा राज कपूर विवाहित होते. त्यांना मुलंही होते. तर नर्गिस त्यावेळी फक्त 16 वर्षांच्या होत्या. राज कपूर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांच्या आणि नर्गिसच्या पहिल्या भेटीची कहाणी ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्या 'बॉबी' चित्रपटात दाखवण्यात आलीय. 'बॉबी' चित्रपटात ज्याप्रमाणे ऋषी आणि डिंपल पहिल्यांदा भेटले होते, त्याच पद्धतीने राज कपूर आणि नर्गिस यांचीही भेट घडली होती.
'बॉबी' रिलीज झाल्यानंतर एक अफवा अशी देखील पसरली होती. या अफवेने तर बॉलिवूडमध्ये भूकंप आला होता. ही अफवा होती की, डिंपल कपाडिया ही नर्गिस आणि राज कपूर यांची अनैतिक संबंधातून झाली मुलगी आहे असं म्हटलं गेलं. अनेक वृत्तपत्रातून आणि चित्रपट मासिकांमधून ही अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. याबद्दल अखेर नर्गिसने एका मुलाखतीत मौन सोडलं.
बॉबी चित्रपट रिलीज झाल्यावर त्यातील डिंपलचा लूक हा आवारा चित्रपटातील नर्गिसच्या लूकसारखा होता. दुसरं कारण ठरलं ते चित्रपटातील डिंपलचा एक सीन नर्गिस आणि राज कपूर यांच्या वास्तविक जीवनातील भेटीचा हुबेहूब होता. तर कोणीतरी या अफवेला खोडसाळ कथांचा आधार घेतला. मात्र राज कपूर, डिंपल कपाडिया, नर्गिस आणि ऋषी कपूर यापैकी कोणालाही यावर चिकार शब्दही काढला नाही. पण मग एका दिवशी नर्गिसचा संयम सुटला आणि एका मुलाखतीत त्यांनी यावर मौन सोडलं. हे सर्व घडले जेव्हा नर्गिसने सुनील दत्तसोबत लग्न केलं होतं. प्रिया दत्त, नम्रता दत्त आणि संजय दत्त यांचा जन्म झाला. तर नर्गिसने चित्रपट जगतातून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.
नर्गिसला मुलाखतीत विचारण्यात आलं की, तिला आता या अफवेवर काही बोलायचं आहे का? यावर नर्गिस म्हणाली, 'मला माहीत नाही की या अफवा कशा, केव्हा आणि कशामुळे उफाळल्या. मी एवढंच म्हणेन की ही कोणाच्या तरी घाणेरडी मनाची कुजलेली उपज आहे. बॉबीमधील डिंपल कपाडियाची भूमिका आवारा चित्रपटातील माझ्या भूमिकेशी थोडीशी मिळतेजुळते असल्याने आणि आणखी काही साम्यही आहे. पण काही लोकांनी त्याला वेगळा रंग दिला. देव अशा लोकांना क्षमा कर आणि त्यांच्यावर दया कर. देव न करो, पण तसं झालं असतं तर मी माझ्या मुलीला कधीच सोडलं नसतं.'
अभिनेत्री पुढे म्हणाली की, 'डिंपल खूप हुशार मुलगी आहे, तिने अशा गोष्टींना मोठा विनोद म्हणून सोडून दिलं. मी आणि माझ्या कुटुंबासाठी, माझ्या पतीने या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या मुलींनी ते हसण्यावर नेलं. पण या अफवेमुळे संजय खूप दुखी झाला होता. पण तो यातून बाहेर येईल. मला या विषयावर बोलून कमी लेखायचे नाही. मला अशा वाईट अफवांना चालना द्यायची नाही.'