मुंबई : ड्रग्स प्रकरणात आर्यन खानचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला आहे. आर्यनच्या कुटुंबाला आशा होती की त्याला बेल बॉन्डच्या आधारावर जामीन मिळेल. पण आर्यनच्या कोठडीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता आर्यन खान ड्रग्स प्रकरणी पुढे काय होईल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. DNA च्या वृत्तानुसार, आर्यन खानसह सर्व 8 आरोपींना कारागृहातील विचाराधीन बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे. अशा बॅरेकमध्ये ठेवलेल्या कैद्यांना घराचे कपडे घालण्याची परवानगी असते. मात्र, या व्यतिरिक्त त्यांना इतर कोणतीही सवलत मिळत नाही.
महत्त्वाचं म्हणजे आर्यन आणि त्याच्यासोबत असलेल्यांना बाहेरचे पादर्थ खाण्याची परवानगी नसेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला कारागृहातील कैद्यांनी तयार केलेले अन्न खावे लागेल आणि जेल मॅन्युअलनुसार सकाळी 6 वाजता उठावे लागेल. यानंतर, कारागृहाच्या नियमानुसार, आर्यनला रांगेत उभे राहून ब्रेक फास्ट करावा लागेल. या नाश्त्यात त्याला फक्त शीरा आणि पोहे मिळतील.
सकाळी 11 वाजता त्यांना तुरुंगातील कैद्यांनी तयार केलेले जेवण मिळेल. आर्यनला दिवसा आणि रात्रीच्या जेवणात पोळी, भाजी, डाळ आणि भात दिला जाईल. अन्नाचे हे प्रमाणही निश्चित असेल आणि त्याला यापेक्षा जास्त आहार मिळू शकणार नाही. त्याला संध्याकाळी 6 वाजता जेवण मिळेल. कैद्यांना हवे असल्यास ते रात्रीचे जेवण 8 वाजता खाऊ शकतात.
पण त्यासाठी त्यांना 6 वाजता रांगेत उभे राहून अन्न घ्यावे लागेल. जर आर्यन आणि त्याच्यासोबत असलेल्यांनी जेवण घेतलं नाही तर त्यांना उपाशी राहावं लागेल. आर्यन खानसह सर्व कैद्यांना सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत बॅरेकच्या बाहेर फिरण्याची परवानगी असेल. संध्याकाळी 6 नंतर त्यांना बॅरेकमध्ये बंद केले जाईल.
दिवसा आर्यनला जेल प्रशासनाने दिलेले कामही करावे लागेल. न्यायालयाने कारागृह प्रशासनाला कडक आदेश दिले आहेत की आर्यनसह कोणत्याही आरोपीला कोणतीही विशेष वागणूक देऊ नये. आर्यन खानला जेवण, पाणी आणि इतर कैद्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा मिळतील.