मुंबई : टीव्हीचा लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 13 वर्षांपासून लोकांना हसवत आहे. या शोच्या प्रत्येक पात्राने लोकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं आहे. जेठालालचं पात्र असो किंवा पोपटलालचं. चाहत्यांना प्रत्येक पात्राची शैली आवडते. त्याचवेळी, शोची सगळ्यात सुंदर अभिनेत्री मुनमुन दत्ता, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये 'बबिता जी'चं पात्र साकारून घरोघरी प्रसिद्ध झाली आहे.
मुनमुन केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. त्यासाठी ती नियमित वर्कआउटसोबत तिच्या डाईटकडे लक्ष देते. मुनमुन तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ अपलोड करते. ती तिच्या फिटनेससाठी योगा करते.
मुनमुन दत्ता योग: मुनमुन दत्ताला योगा करायला आवडतात. ती तिच्या फिटनेससाठी ही चार आसने नियमीत करते.
बालासना: ज्याला चाईल्ड बाल पोझ म्हणून ओळखलं जातं. यामुळे पाठ, मांड्या आणि हिप्स मजबूत होतात आणि पाठदुखीपासूनही आराम मिळतो.
गोमुखासन: याला गोमुख मुद्रा म्हणूनही ओळखलं जातं.
मार्जरी आसन: हे आसन कॅट पोज म्हणूनही ओळखलं जातं. यामुळे पाठीच्या स्नायूंमध्ये लवचिकता येते आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
सेतुबंधन: हे आसन ब्रिज पोझ म्हणूनही ओळखलं जातं. हे मांड्या आणि हिप्ससह पोटाची चरबी देखील कमी करते. योगाव्यतिरिक्त मुनमुन दत्ता स्वतःला फिट आणि शेपमध्ये ठेवण्यासाठी कार्डिओ किक बॉक्सिंग आणि वेट ट्रेनिंग देखील करते.