अबब! दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 21 दिवसातच अभिनेत्री पुन्हा प्रेग्नंट?

अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 5, 2022, 01:43 PM IST
अबब!  दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 21 दिवसातच अभिनेत्री पुन्हा प्रेग्नंट? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची वहिनी आणि प्रसिद्ध हॉलिवूड स्टार सोफी टर्नर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स' या सीरिजमधून सोफीला खरी ओळख मिळाली. सोफीनं नुकतंच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आणि आता पुन्हा एकदा सोफी तिच्या तिसर्‍यांदा प्रेग्नंट असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. खरं तर, सोफी टर्नरचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तो समोर येताच ती तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सोफी नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. आता सोफीनं पुन्हा तिच्या बेबी बंपसह एक न पाहिलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. सोफीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे, या फोटोत ती तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. सोफीनं काळ्या रंगाचा क्रॉप टॉप, लेगिंग्स आणि राखाडी-नारिंगी जॅकेट परिधान केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोफी बेडवर पडून डोळे मिटून हसताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, 'फुल्ल ऑफ बेबी.' त्याचवेळी तिचा हा सस्पेन्सफुल फोटो पाहून काही युजर्सना ती तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचे वाटत आहे. फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'मी तुझ्यासाठी आनंदी आहे सोफी.' तर दुसऱ्यानं लिहिले, 'हा नवीन फोटो आहे की जुना.' सोफीचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांचा गोंधळ उडाला आहे. सोफीचे हे फोटो जुने आहेत की नवीन हे नेटकऱ्यांना समजू शकलेले नाही.

सोफी टर्नर आणि जो जोनास हे २९ जून २०१९ रोजी विवाह बंधनात अडकली झाला होता. त्यांच्या मुलीचं नाव विला आहे तर १४ जुलै रोजी सोफीनं त्यांच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला. सोफी ही हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.