''नाकावरच्या रागाला औषध काय?'' गाण्यातील 'ती' दोन लहान मुलं 34 वर्षांनंतर काय करतात?

Nakavarchaya Ragala Aaushadh Kay Song Children: जुने चित्रपट हे आपल्याला कायमच आवडतात त्यातून अशा चित्रपटांमध्ये जर का कोणी लहान मुलं असतील तर आपल्या त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला अजूनच आवडते. परंतु तुम्हाला 'कळत नकळत' (Kalat Nakalat) हा चित्रपट आठवत असेल तर तुम्हाला त्यातील 'नाकावरच्या रागाला औषध काय?' हे गाणं नक्कीच आठवत असणार सध्या या गाण्यातील ती दोन लहान मुलं काय करतात तुम्हाला माहितीये का? 

गायत्री हसबनीस | Updated: May 24, 2023, 06:24 PM IST
''नाकावरच्या रागाला औषध काय?'' गाण्यातील 'ती' दोन लहान मुलं 34 वर्षांनंतर काय करतात?  title=
फाईल फोटो

Nakavarchaya Ragala Aaushadh Kay Song Children: जुने मराठी चित्रपट हे आपल्या सर्वांच्याच पसंतीचे आहेत. चित्रपट कितीही जूने असतो मराठी प्रेक्षक ते आवडीनं पाहतातच. या जुन्या चित्रपटांमधील गाणीही प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे कुठेही ही गाणी लागली की आपण ती संपुर्ण ऐकल्याशिवाय पुढे (Old Marathi Films) जातच नाही. 1989 साली आलेला 'कळत नकळत' (Kalat Nakalat) हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटात एक गाणं (Old Marathi Songs) आहे जे तुम्ही लहानपणी नक्कीच गुणगुणलं असाल.

या गाण्यातील बच्चू आणि छकुली ही दोन मुलंही तुम्हाला आठवत असतीलच. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता 34 वर्षे पुर्ण झाली आहेत. ही दोन्ही मुलं आता मोठी झाली असून त्यांना ओळखता येणंही तुम्हाला कठीण जाईन. 

1989 साली 'कळत नकळत' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे आणि अशोक सराफ यांच्या प्रमुख भुमिका होत्या. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. नाकावरच्या रागाला औषध काय, या गाण्यात अशोक सराफांसह (Ashok Saraf) दोन मुलं झळकली होती. यामध्ये अशोक सराफ म्हणजेच छोटूमामा आपल्या भाजीला म्हणजेच छकूलीला समजावत असतात. तिचा राग दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. हे गाणं तेव्हा सगळ्यांच्याच तोंडी गाजलं होतं.

'ती' दोन मुलं आठवतात का? 

चित्रपटात या दोन मुलांची नावं होती. बच्चू आणि छकुली. ओमेय आंब्रे आणि मृण्मयी चांदोरकर यांनी या भुमिका साकारल्या होत्या. त्यांच्या गोंडस हावभावानं त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन 34 वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षांनंतर तुमच्या आवडत्या गाण्यातील ही दोघं जण नक्की कशी दिसतात आणि काय करतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच.

हेही वाचा - ''आई निरक्षर असल्यामुळे...'' आपल्या जन्मतारखेबद्दल अभिनेत्यानं सांगितला 'तो' भावुक प्रसंग

सध्या काय करतात? 

ओमेय आंब्रे हा न्यू जर्सीमध्ये स्थायिक झाला आहे. आता हे दोघंही अभिनयापासून दूर आहेत. त्यांचे लग्नंही झाले आहे आणि त्यांना आता दोन मुलंही आहेत. या चित्रपटातील छकुली म्हणजे मृण्मयी चांदोरकर (Mrunmanyi Chandorkar) ही सुप्रसिद्ध लेखक व.पु.काळे यांची नातं आहे. व.पु.काळे यांची कन्या स्वाती चांदोरकर यांची ती मुलगी आहे. मृण्मयीचेही लग्न झाले आहे. तीही घर संसारात व्यस्त आहे.