परिणीतिनंतर आता विद्युत जामवाल अडकणार लग्न बंधनात!

Vidyut Jammwal : विद्युत जामवाल लवकरच अडकणार लग्न बंधनात! 2021 मध्ये रिलेशनशिपविषयी केला होता खुलासा...

दिक्षा पाटील | Updated: Oct 7, 2023, 05:35 PM IST
परिणीतिनंतर आता विद्युत जामवाल अडकणार लग्न बंधनात!  title=
(Photo Credit : Social Media)

Vidyut Jammwal : बॉलिवूडमध्ये आजकाल लगीन सराईचा काळ सुरु झाला आहे. नुकतीच अभिनेत्री परिणीति चोप्रा ही लग्न बंधनात अडकली. आता तिच्यानंतर अभिनेता विद्युत जामवाल देखील लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. विद्युत जामवालनं 1 सप्टेंबर 2021 रोजी नंदिता महतानीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्यानंतर अशी बातमी आली होती की ते दोघे विभक्त झाले आहेत. पण आता ते दोघं लंडनमध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. 

ब्रेकअप अन् आता लग्न? 

News18 च्या रिपोर्ट्सनुसार, अशी चर्चा सुरु आहे की विद्युत जामवाल आणि नंदिता महतानी त्यांच्या नात्याला आणखी एक चान्स देण्याचा विचार करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, तर ते दोघं आता थेट लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या आधी न्यूज एजेंसी IANS च्या रिपोर्ट्सनं दिलेल्या माहितीनुसार, अलाना पांडेच्या मेहंदी सेरेमनीमध्ये विद्युत आणि नंदिता रात्रभर एकत्र दिसले. रिपोर्ट्समध्ये हे देखील म्हटलं की विद्युत हा प्रायव्हेट पर्सन आहे. त्याला त्याचं आयुष्य ही खासगी ठेवायला आवडतं. त्यामुळेच नंदिता त्याच्यापासून विभक्त झाली. विद्युत आणि नंदिता या दोघांपैकी कोणीही या बातमीला दुजोरा दिलेला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

2022 मध्ये ईटाइम्सनं दिलेल्या रिपोर्टनुसार, विद्युत जामवाल आणि नंदिता महतानी लग्न बंधनात अडकणार आहेत. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की यावेळी नंदिता लंडनमध्ये होती आणि तिच्या लग्नाची तयार करत आहे. त्यानंतर हे देखील सांगितलं की विद्युत आणि नंदितानं आधीच साध्या पद्धतीनं लग्न केलं असून हे त्यांनी कोणालाही सांगितलेलं नाही. 

हेही वाचा : ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपनंतर अशी झालेली सलमानची अवस्था, रवि किशन यांनी सांगितला शूटिंगचा किस्सा

विद्युत जामवालनं आग्राच्या ताज महालच्या जवळ त्याची गर्लफ्रेंड नंदिता महतानीसाठी एका परिकथ करण्याची योजना केली आहे. तर जेव्हा विद्युत जामवालनं त्याच्या साखरपुड्याची घोषणा केली होती तेव्हा त्यानं कॅप्शन दिलं होतं की हे कमांडोच्या पद्धतीनं झालं? 

कोण आहे नंदिता?

नंदिता विषयी बोलायचे झाले तर हे तिचे दुसरे लग्न आहे. तिचं पहिलं लग्न हे बिझनेसमॅन संजय कपूर यांच्यासोबत झाले होते. संजय कपूर हे अभिनेत्री करिश्मा कपूरचा पती होता.