व्हिडिओ : 'प्यारी बिंदू' असा करतेय टाईमपास...

परिणीती चोप्राकडे सध्या चांगल्या सिनेमांची ऑफर नाहीय. पण चर्चेत राहण्यासाठी परिणीती अतरंगीपणा करतेय.

Updated: Jul 13, 2017, 11:28 PM IST
व्हिडिओ : 'प्यारी बिंदू' असा करतेय टाईमपास...  title=

मुंबई : परिणीती चोप्राकडे सध्या चांगल्या सिनेमांची ऑफर नाहीय. पण चर्चेत राहण्यासाठी परिणीती अतरंगीपणा करतेय.

रिकाम्या वेळात स्वत:ची करमणूक कशी करायची हे परिणीतीकडून शिकायला हवं. नुकताच परिणीती चोप्राने तिचा एक डान्सिंग व्हिडिओ फॅन्सबरोबर शेअर केलाय.

How to pass time between shots:- A tutorial. Thankyou @artinayar for inspiring me

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

या व्हिडिओमध्ये परिणीती शमिता शेट्टीचं फेमस आयटम सॉंग 'शरारा शरारा' या गाण्यावर डान्स करतांना दिसतेय. परिणीतीला मानवं लागेल. कारण तिचे डान्स स्टेप भन्नाट आहेत. म्हणजेच गायनाबरोबर परिणीती नृत्यही चांगलं करते तर... तसं सतत चर्चेत राहणं चांगलंच आहे पण त्याबरोबर जरा तिनं आपल्या करिअरवरही लक्ष द्यायला हवं.

परिणीतीचा मागचा सिनेमा 'मेरी प्यारी बिंदू' बॉक्स ऑफिसवर चारही मुंड्या चित झाला होता. त्यामुळे सध्या तरी परिणीतीला एका हिट सिनेमाची प्रतिक्षा आहे. दिबाकर बॅनर्जीच्या संदिप अॅण्ड पिंकी फरार या सिनेमात परिणीती पुन्हा एकदा अर्जुन कपूर स्क्रिन शेअर करणार आहे. परिणीतीला या सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. जर हा सिनेमा फ्लॉप झाला तर परिणीतीला गाणं गाऊन आणि नृत्य करुनचं उदरनिर्वाह करावा लागेल.