...या गाण्यानं यूट्यूबवर तोडला 'गंगनम स्टाईल'चा रेकॉर्ड!

युट्यूबवर सध्या एका गाण्यानं धुमाकूळ माजवलाय. या गाण्यानं 'गंगनम स्टाईल'ला मागे टाकत आत्तापर्यंत टसर्वात जास्त वेळा पाहिला गेलेला व्हिडिओ' हा खिताब आपल्या नावावर नोंदवलाय.

Updated: Jul 13, 2017, 08:22 PM IST
...या गाण्यानं यूट्यूबवर तोडला 'गंगनम स्टाईल'चा रेकॉर्ड! title=

मुंबई : युट्यूबवर सध्या एका गाण्यानं धुमाकूळ माजवलाय. या गाण्यानं 'गंगनम स्टाईल'ला मागे टाकत आत्तापर्यंत टसर्वात जास्त वेळा पाहिला गेलेला व्हिडिओ' हा खिताब आपल्या नावावर नोंदवलाय.

गायक विज खलीफा आणि चार्ली पथचं गाणं 'सी यू अगेन'ला आत्तापर्यंत २ अरब ९० करोडहून अधिक व्ह्यूज मिळालेत. यासोबतच या गाण्यानं आत्तापर्यंत सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या व्हिडिओमध्ये  पहिला क्रमांक पटकावलाय. 

'सी यू अगेन' हे गाणं २०१५ साली प्रदर्शित करण्यात आलं होतं. 'फास्ट अॅन्ड फ्युरिअस ७'साठी हे गाणं लिहिण्यात आलं होतं. बिलबोर्ड हॉट १०० मध्येही हे गाणं टॉपवर आहे. इतकंच नाही तर या गाण्याला सॉन्ग ऑफ द इअर, बेस्ट पॉप ड्युओ / ग्रुप परफॉर्मन्ससाठीही निवडण्यात आलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, २०१२ साली प्रदर्शित झालेल्या 'गंगनम स्टाईल' या व्हिडिओला आत्तापर्यंत २ अरब ८९ करोड हून अधिक व्हयूज मिळालेत. तर तिसऱ्या स्थानावर आहे जस्टिन बीबरचं 'सॉरी' हे गाणं...