VIDEO : अजय देवगणच्या ‘रेड’चा धमाकेदार Trailer रिलीज

गेल्यावर्षी ‘बादशाहो’ आणि ‘गोलमान अगेन’ या दोन धमाकेदार सिनेमांच्या यशानंतर आता पुन्हा अजय देवगण पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय. अजग देवगणच्या ‘रेड’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 6, 2018, 03:45 PM IST
VIDEO : अजय देवगणच्या ‘रेड’चा धमाकेदार Trailer रिलीज title=

नवी दिल्‍ली : गेल्यावर्षी ‘बादशाहो’ आणि ‘गोलमान अगेन’ या दोन धमाकेदार सिनेमांच्या यशानंतर आता पुन्हा अजय देवगण पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय. अजग देवगणच्या ‘रेड’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. 

इलियाना - अजय पुन्हा एकत्र

‘रेड’ या सिनेमाचं पोस्टरही नुकतंच रिलीज करण्यात आलं असून त्यानंतर लॉन्च झालेल्या ट्रेलरनेही सिनेमाची उत्सुकता वाढवली आहे. अजय पुन्हा एकदा त्याच्या ‘सिंघम’ लूकमध्ये या सिनेमातून बघायला मिळणार आहे. ‘बादशाहो’ नंतर पुन्हा एकदा इलियाना डिक्रूज अजय देवगणसोबत काम करताना दिसणार आहे. 

अजय कुणावर टाकणार ‘रेड’

‘रेड’ या सिनेमात अजय देवगण लखनऊच्या डेप्युटी कमिश्नरच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘गंगाजल’ मधील पोलीस अधिका-याच्या भूमिकेने त्याने धमाका केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा तो तत्ववादी अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. आता अजग देवगण या सिनेमातून प्रेक्षकांवर ‘रेड’ टाकू शकणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. 

कधी होणार रिलीज?

या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार, कृषण कुमार, कुमार मंगत आणि अभिषेक पाठक यांनी केलीये तर दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केलंय, येत्या १६ मार्च रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.