मुंबई : हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्यातील कायदेशीर वादात विचित्र खुलासे होत आहेत. जॉनीने त्याची एक्स पत्नी अंबरविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला असून, त्याची सुनावणी व्हर्जिनिया न्यायालयात सुरू आहे. या सुनावणीदरम्यान, अनेक मनोरंजक आणि विचित्र खुलासे होत आहेत ज्यावरून हे स्पष्ट होतं आहे की, जॉनी आणि अंबरचं नातं किती वाईट होतं. सुनावणीदरम्यान असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. जे ऐकून कोर्टात सगळेच जोरजोरात हसू लागले.
जॉनीने घरात केली लघवी?
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान जॉनीवर त्याच्या घरात लघवी केल्याचा आरोप आहे. ही घटना 2015 मधील तिच्या 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन: डेड मेन टेल्स नो टेल्स' या चित्रपटासाठी शूटिंग करत असतानाची असल्याचं सांगितलं जात आहे. सुनावणीदरम्यान डेपचा बॉडीगार्ड माल्कम कॉनोली यांचं जबाब नोंदवण्यात आला. मात्र, माल्कमने कोर्टात सांगितलं की, त्याने आवाज ऐकला होता पण जॉनी लघवी करताना दिसला नाही.
जॉनीचा प्रायव्हेट पार्ट पाहिला का?
अंबरचे वकील माल्कमला प्रश्न विचारत असताना कोर्टात विचित्र परिस्थिती निर्माण झाली. असा प्रश्न वकिलांनी विचारला ज्यावर जॉनीसोबत सगळेजण हसू लागले. अंबरच्या वकिलांनी माल्कमवर जॉनीचा प्रायव्हेट पार्ट पाहिला आहे का हे विचारण्यासाठी दबाव टाकला. यावर उत्तर देत माल्कम म्हणाला, 'मी मिस्टर डेपचा प्रायव्हेट पार्ट पाहिला असता तर मला आठवलं असतं.' माल्कमचे उत्तर ऐकून जॉनीलाही हसू आवरता आलं नाही.
Courtroom Moment: The courtroom laughed at the response of #JohnnyDepp's bodyguard when asked about Depp allegedly urinating in his foyer at his Australia home and his penis. @LawCrimeNetwork pic.twitter.com/QXTIFX4s3f
— Law&Crime Network (@LawCrimeNetwork) April 28, 2022
एंबरने बेडवर केली पॉटी
रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, जॉनीच्या सुरक्षा टीमच्या सदस्याने न्यायालयात कबूल केलं की, 2016 मध्ये, अंबर हर्डने भांडणानंतर जॉनीच्या बेडवर पॉटी केली होती. जॉनी आणि अंबरमध्ये वाईट भांडण झालं आणि त्यानंतर जॉनी त्याच्या दुसऱ्या घरी गेला. यानंतर अंबरने जॉनीचं सामान फेकायला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील नोकराला बेडवर जॉनीच्या बाजूला पॉटी दिसली जी अंबरने रागाच्या भरात केली. अंबरने या कृत्याला जॉनीच्या पाळीव कुत्र्यांवर दोष देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नंतर त्याने हे घाणेरडं कृत्य केल्याचं कबूल केलं.