Vicky Kaushal ची दिवाळी पोस्ट चर्चेत..katrina विषयी बोलून गेला असं कि..

विकी कौशलने पोस्टला दिलेलं कॅप्शन सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे....

Updated: Oct 25, 2022, 08:44 PM IST
Vicky Kaushal ची दिवाळी पोस्ट चर्चेत..katrina विषयी बोलून गेला असं कि..  title=

Diwali 2022:  दिवाळी सण  सर्वांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा सण  लहान थोरांपासून सर्वानाच दिवाळी सणाचं फार अप्रूप असत.. घरोघरी फराळ बनतो नातेवाईक आप्तेष्ट मंडळी भेटायला येतात, एकत्र फराळ असो किंवा मग स्नेहभोजन असो सर्व काही आनंदी वातावरण असत सगळीकडे एक वेगळ्या प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो.  

वसुबारस च्या दिवशी दिवाळी सणाला सुरवात होते त्यांनतर धनतेरस असते, यांनतर येतो तो दिवस लक्ष्मीपूजनाच्या . या दिवशी  घरी देवी लक्ष्मीची आणि श्री गणेशाची पूजा करतात. वर्षभर आणि सतत आपल्या घरी देवी लक्ष्मीने वास करावा आपल्या घरी सुख समृद्धी नांदावी म्हणून देवीची  पूजा अर्चना केली जाते , आपल्याला सर्व प्रकारच्या समस्यांपासून, दुःखांपासून दूर ठेवण्यात यावं यासाठी  श्री गणेशाची आराधना केली जाते. 

सर्वांसाठीच दीपावली खूप खास असते लग्न झालेल्यांसाठी आणि विशेष म्हणजे ज्यांची लग्नानंतर  पहिली दिवाळी असते ती थोडी जास्तच खास असते . नुकतेच दिवाळी सणातील लक्ष्मीपूजन संपूर्ण भारतभर मोठ्या जोशात उत्साहात साजरे झाले. अनेक नवविवाहित जोडप्यांनी  मोठ्या आनंदाने पहिली वाहिली दिवाळी एकत्रपणे साजरी केली असेलच. 

यात कलाकार मंडळीसुद्धा मागे नाहीयेत. अनेक कलाकार मंडळीनीसुद्धा आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी सणाचा आनंद घेतला लक्ष्मीपूजन पार पडले आणि त्याचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. (Vicky Kaushal post viral said special words for wife katrina kaif )

या सर्वांमध्ये विशेष लक्ष वेधून घेतलय ते म्हणजे विकी कौशलच्या (vicky kaushal)  इंस्टाग्राम पोस्टने. विकी कौशलने लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने त्याचा आणि पत्नी अभिनेत्री कतरीना कैफ (katrina kaif) चा एक फोटो पोस्ट केला आणि त्यासोबत सुंदर कॅप्शन सुद्धा दिलय .. विकी कौशलने  दिलेलं कॅप्शन सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.(vicky kaushal diwali post for katrina kaif) 

विकीने पोस्ट केलेल्या फोटोवर लिहिलंय कि  '' घर की लक्ष्मी के साथ लक्ष्मी पूजा हो गयी। आप सभी को हमारी तरफ़ से शुभ दीपावली''