Salman Khan च्या बॉडीगार्डनं खरंच धक्का दिला? विकी कौशल नक्की काय म्हणाला 'त्या' VIRAL VIDEO बद्दल

Salman Khan and Vicky Kaushal : सलमान खान आणि विकी कौशल यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा आहे. त्या व्हिडीओवरून सलमाननं विकीला इग्नोर केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्या व्हिडीओवर नक्की काय झालं हे विकीनं सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 27, 2023, 12:35 PM IST
Salman Khan च्या बॉडीगार्डनं खरंच धक्का दिला? विकी कौशल नक्की काय म्हणाला 'त्या' VIRAL VIDEO बद्दल  title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan and Vicky Kaushal : सध्या सगळीकडे आयफाची चर्चा सुरु आहे. सगळे सेलिब्रिटी आयफाला हजेरी लावत आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचाविषय ठरत आहेत. या सगळ्यात चर्चा सुरु होती ती बॉलिवूडचा भाई जान म्हणजेच सलमान खान आणि विकी कौशलच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओची. त्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत सलमाननं विकी कौशलला इग्नोर केल्याचे म्हटले जात होते. इतकेच नाही तर सलमानच्या बॉडीगार्ड्सनं त्याला धक्का देखील दिला अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणावर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली आहे. इतकंच नाही तर त्या संपूर्ण प्रकरणावर विकीनं त्याची प्रतिक्रिया देखील दिली आहे. 

एएनआयनं त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत विकी कौशलला या संबंधीत प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया देत विकी कौशल म्हणाला व्हिडीओत जसं दिसत आहे तसं काही नाही. याविषयी विकी म्हणाला, बऱ्याचवेळा गरज नसताना अनेक चर्चा सुरु होतात. त्याचा काही अर्थ देखील नसतो. खरंतर गोष्टी तशा नसतात. त्यामुळे या विषयी बोलण्यात काही अर्थ नाही. दरम्यान, विकी आणि सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सलमान मागून येतो आणि विकीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मग त्यानंतर विकीशी काही बोलतो आणि ते दोघं मिठी मारतात. त्यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडनं शेअर केला आहे. 

हेही वाचा : "पाटलीण हायेस... रुबाबात नाच, बिनधास्त नाच", Gautami Patil साठी किरण माने यांची खास पोस्ट

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, सगळ्यात आधी व्हायरल झालेल्या सलमान आणि विकीच्या व्हिडीओवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी त्याचं कनेक्शन विकीची पत्नी कतरिना कैफशी जोडलं होतं. अनेकांनी कमेंट केल्या की सलमाननं कतरिनामुळे विकीकडे दुर्लक्ष केलं आहे. पण आता व्हायरल झालेल्या नव्या व्हिडीत विकी मुलाखत देत असताना त्याला मध्येच थांबवत त्याच्याशी बोलल्यानं अनेकांनी सलमानची स्तुती केली आहे. सगळ्यात महत्तावाचे म्हणजे अबुधाबीमध्ये IIFA अवॉर्ड्स 2023 चे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये विकी कौशल, सलमान खान, अभिषेक बच्चन, रकुल प्रीत सिंग आणि ईशा गुप्ता यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. सलमानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच कतरिना कैफसोबत टायगर 3 मध्ये दिसणार आहे.