Vicky Kaushal Father Sham Kaushal : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचे वडील आणि लोकप्रिय अॅक्शन दिग्दर्शक श्याम कौशल हे गेल्या दोन दशकां पेक्षा जास्त काळापासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमधअये भयानक असे स्टंट केले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी अनेक सीन्सचे दिग्दर्शन देखील केले आहेत. श्याम यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी एक स्टंटमॅन म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आणि मग एक अॅक्शन दिग्दर्शक झाले. पण त्यांचा हा सगळा प्रवास सोपा नव्हता त्यांनी जीव-धोक्यात जाईल असे अनेक स्टंट केले तर काही डायरेक्ट केले. त्यापैकीच एक स्टंट हा शाहरुख खानच्या 'ओम शांति ओम' या चित्रपटातील होता. ते या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. तर या चित्रपटातील एक स्टंटमुळे त्यांची अवस्था खराब झाली आणि त्यांना हार्ट अटॅक येईल असं वाटू लागलं होतं.
श्याम कौशल यांनी 'कोमल नाहटा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की ते स्टंटमॅन होते, त्यामुळे कधी-कधी त्यांना वाटायचं की स्टंट करताना थोडं जास्तच करतात. तर ते अॅक्शन डायरेक्टर होते, तेव्हा वाटायचं की हार्ट अटॅक येईल. श्याम कौशल यांनी स्टंटविषयी सांगितलं की "मी एक स्टंट करत होतो, ज्यात माझ्या शरीराव आग लागली होती आणि मला धावत जाऊन स्विमिंग पूलमध्ये उडी मारायची होती. मी स्विमिंग पूलच्या जवळ पोहोचलो, तेव्हा मला ती आग खरंच जाणवू लागली होती. माझ्यात डोळ्यात देखील आग होत होती, त्यामुळे ज्या ठिकाणाहून मला उडी मारायची होती, त्या आधीच मी उडी मारली. माझ्या शरिरातून बाहेर पडणारी आग मी पाहू शकत होतो."
श्याम कौशल यांनी पुढे सांगितलं की "'ओम शांति ओम' मध्ये जिथे चित्रपटाच्या सेटवर आगा लागली होती, तिथे सेटवर कलाकारा होते, तीन कॅमेरे होते, माझ्या टीमचे 60 लोक देखील तिथे आत होते. आम्हाला आग लागल्यापासून ती विझेपर्यंत सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची होती कारण एका सेकंदाचा फरक हा धोकादायक ठरु शकत होता. हे असे क्षण असतात, जिथे तुमचा जीव देखील जाऊ शकतो आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला हार्ट अटॅक येणार आहे. मला अनेकदा अश्रू अनावर होतात."
पुढे श्याम कौशल यांनी मणिरत्नम यांच्या रावण या चित्रपटातील एका अॅक्शन सीनविषयी सांगितलं की "मणिरत्नमच्या क्यायमॅक्स सीनमध्ये पूल वाहून जातो आणि त्यावर एक फाइट सीन होतो. आम्ही मालशेज घाटात एक खरा पूल तयार केला होता आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नव्हता. हा जो घाट होतो तो 2 हजार फूट खोल होता. माझी स्टंट टीम आधी जाऊन रिहर्सल करत होती. आम्ही त्यांना हार्नेस घालतो, क्रेननं पुलावर सोडायचो आणि मग रिहर्सल करुन घ्यायचो. त्यानंतर त्यांना परत खाली घेऊन येण्यात यायचं आणि मग आम्ही कलाकारांना घेऊन यायचो. ती वेळ अशी होती जेव्हा माझा जीव तुटत होता."
हेही वाचा : मंदिराच्या बाहेर जेवणाची पाकिटं वाटताना दिसली सारा अली खान, कॅमेरे पाहताच संतापली अभिनेत्री
श्याम कौशल हे गेल्या चार दशकांपासून चित्रपटसृष्टीचा भाग होते. आता त्यांची मुलं विकी आणि सनी हे बॉलिवूडमध्ये काम करताना दिसत आहे. तर त्यांची सून कतरिना कैफ ही देखील अभिनेत्री आहे. कतरिनाच्या 'फॅन्टम' चित्रपटाचे सीन्स त्यांनी डायरेक्ट केले होते.