कतरिना-विकी करतायत एकमेकांना डेट?

रुपेरी पडद्यावर विकीसोबत एकत्र काम करण्याची कतरिनाची इच्छा

Updated: Jan 7, 2020, 08:46 AM IST
कतरिना-विकी करतायत एकमेकांना डेट? title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सतत कोणत्या न कोणत्या विषयांवर चर्चा सुरू असतात. आता चर्चा रंगत आहे ती म्हणजे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या नात्याची. एका पुरस्कार सोहळ्या दरम्यान विकीने अभिनेता सलमान खान समोर कतरिनाला लग्नाची मागणी घातली होती. 'माझ्यासोबत लग्न करशील का?' या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली 'अता हिंमत नाही.' या दिवसानंतर त्यांच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच रंगू लागल्या. 

दोघेही उद्योगपती अंबानींच्या दिवाळी पार्टीमध्ये देखील एकत्र झळकले होते. आता पुन्हा कतरिना आणि विकीला एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. त्यांची काही फोटो देखील कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहेत. कटरिना अणि विकी निर्माती आरती शेट्टीच्या घरी भोजनासाठी उपस्थित होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Write it on your heart that every day is the best day of the year  #2020

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

यावेळेस जरी ते दोघे वेग-वेगळ्या कार मधून आले असले तरी त्यांच्यात लाल गुलाब बहरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याठिकणी कतरिना मेकअप शिवाय तर विकी काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसला होता. परंतु या प्रेमाच्या नात्याला दोघांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. 

तर, करण जोहरच्या शोमध्ये कतरिनाने विकीसोबत एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आतापर्यंत विकी-कतरिनाने कधीही एकत्र स्क्रिन शेअर केलेली नाही. पण आता रंगत असलेल्या चर्चांवरून असे स्पष्ट होते की ते दोघे एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस नक्की येतील.