मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. सारा तिच्या आई आणि भावासोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याच दरम्यान तिने सोशल मीडियावर शेअर केलेले बिकिनी फोटोज, खोल पाण्यातील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नुकताच साराने निळ्या समुद्रातील खोल पाण्यातील पोहतानाचा 'जलपरी मै चली...' असं म्हणतं एक व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांकडून हा व्हिडिओ अनेकदा पाहण्यात येत आहे.
सारा सोशल मीडियावर बरीच ऍक्टीव्ह आहे. तिच्या शूटिंगचे, कुटुंबियांसोबतचे क्षण ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी साराने आई अमृता सिंह, भाऊ इब्राहिमसह समुद्रातील व्हिडिओ, फोटो शेअर केले आहेत. या तिघांचे समुद्रातील राईडचे फोटोही साराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले होते.
साराने आतापर्यंत केवळ दोन चित्रपटातूनच काम केलं आहे. तिने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली. त्यानंतर आलेल्या 'सिंबा' चित्रपटातूनही तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची दाद मिळाली.
सारा लवकरच 'लव आजकल'चा सीक्वल 'आजकल'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांत सारा कार्तिक आर्यन आणि रणदीप हुड्डासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय सारा वरुण धवन स्टारर 'कुली नंबर १' चित्रपटातून भूमिका साकारणार आहे. आधीच्या चित्रपटांप्रमाणे या दोन चित्रपटांतूनही साराला पसंती मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.