Happy Birthday Urmila Matondkar: बॉलिवूडमध्ये मराठी लोकांना घाटी म्हटलं जातं, उर्मिला मातोंडकरने उघड केला Bollywood चा खरा चेहरा

 बॉलिवूडमधील मराठमोळा चेहरा असणाऱ्या उर्मिला मातोंडकरचा (Urmila Matondkar) आज 49 वा वाढदिवस आहे. आपल्या बिनधास्त अभिनयाने 1990 च्या दशकात प्रेक्षकांना आपली भुरळ पाडणारी उर्मिला सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. दरम्यान एका मुलाखतीत तिने बॉलिवूडमध्ये मराठी लोकांना कशी वागणूक दिली जाते याचा खुलासा केला होता. 

Updated: Feb 4, 2023, 11:53 AM IST
Happy Birthday Urmila Matondkar: बॉलिवूडमध्ये मराठी लोकांना घाटी म्हटलं जातं, उर्मिला मातोंडकरने उघड केला Bollywood चा खरा चेहरा title=

Happy Birthday Urmila Matondkar: बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा आज वाढदिवस (Urmila Matondkar Birthday) आहे. 1990 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या उर्मिला मातोंडकरने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. 'रंगीला' (Rangeela) चित्रपटानंतर एक बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी ओळखच तिला मिळाली होती. पण तिचा बॉलिवूडमधील हा प्रवास फार सोपा नव्हता. मराठी (Marathi) असल्याने तिला सुरुवातीच्या काळात अडचणींचा सामना करावा लागला होता. एका मुलाखतीत तिने बॉलिवूडमध्ये (Bollywood) कशाप्रकारे मराठी लोकांना 'घाटी' म्हणून संबोधल जातं सांगत पोलखोल केली होती.

काय म्हणाली होती उर्मिला? 

"मला तेव्हा मराठी म्हटलंच जायचं नाही. घाटी लोकांना नीट हिंदीही बोलता येत नाही. त्यांच्या हिंदीला घाटीपणाचा वास येतो. हे काय घाटी कपडे घातले आहेत. बॉलिवूडमध्ये अशी परिस्थिती आहे हे डावलून चालणार नाही," असं उर्मिलाने सांगितलं होतं.
 
“एक अभिनेत्री, मराठी असल्याचा त्रास मी सहन केला आहे. मला अनेक गोष्टी भोगाव्या लागल्या आहेत. मी त्यावेळी नेपोटिझमबद्दल बोलले नव्हते. पण मात्र मी या सर्व गोष्टींवर बोलत आहे. त्यावेळी मराठी लोकांना चित्रपटसृष्टीत घाटी असंही संबोधलं जात होतं,” अशी खंत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने व्यक्त केली होती.

"हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही"

दरम्यान हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही आहे याची कबुली उर्मिलाने दिली होती. "1990 च्या दशकात जवळपास १५ ते १६ अभिनेत्री माझ्यासह चित्रपटसृष्टीत आल्या होत्या. त्यामधील ११ ते १२ अभिनेत्री या बॉलिवूडमध्ये कोणाच्या तरी नात्यात होत्या. त्यामुळे घराणेशाही किंवा नेपोटेझिम हे आज आलेलं नाही. ते अनेक वर्षांपासून आहे. हे फक्त बॉलिवूडमध्येच नाही. तर प्रत्येक क्षेत्रात आहे," असं उर्मिलाने सांगितलं होतं. 

उर्मिला सध्या राजकारणात 

उर्मिला मातोंडकरने 9 सप्टेंबर 2021 ला 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. याआधी त्या काँग्रेस पक्षात होत्या. पण अंतर्गत राजकारणामुळे राजीनामा दिला. शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं होतं. पण राज्यपालांनी संमती न दिल्याने ही निवड अद्यापही झालेली नाही. 

उर्मिला मातोंडकरने बालकलाकार म्हणून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. तिने लहानपणी श्रीराम लागू यांच्यासोबतही काम केलं आहे. १९९१ मध्ये आलेल्या 'नरसिम्हा' चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २०१६ मध्ये उर्मिलाने काश्मिरी मॉडेल, उद्योजक मोहसीन अख्तरसोबत याच्यासोबत लग्न करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यासाठी तिने धर्मांतरही केलं.