टॉपलेस अभिनेत्री आणि तिच्या शरीरावरच्या 'त्या' खुणा.... वाचा नेमका काय प्रकार

हटके दिसण्यासाठी अभिनेत्री सगळ्यांसमोर झाली टॉपलेस, पण नंतर शरीरावर दिसल्या अशा खुणा

Updated: Mar 12, 2022, 04:34 PM IST
टॉपलेस अभिनेत्री आणि तिच्या शरीरावरच्या 'त्या' खुणा.... वाचा नेमका काय प्रकार title=

मुंबई : बिग बॉस ऑटीटी फेम अभिनेत्रीनं टॉपलेस होत बोल्ड फॅशन स्टाईल करण्याचं धाडस केलं. मात्र हेच धाडस तिला चांगलंच महागात पडलं आहे. तिच्या फॅशनमुळे सर्व आश्चर्यचकीत झाले होते. या अभिनेत्रीनं साखळ्यांचा वापर करून आपलं अंग झाकलं होतं. ही अजब फॅशन स्टाईल करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे. 

स्टाईल आणि बोल्ड फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या उर्फी जावेदला टॉपलेस फॅशन करणं महागात पडलं आहे. अनेक साखळ्या कुलुपासोबत जोडून त्याची फॅशन स्टाईल करत तिने सर्वांना थक्क केलं होतं. तिने आपलं अंग साखळीनं झाकलं होतं. मात्र ही फॅशन स्टाईल तिला महागात पडली. 

स्टाईलमुळे उर्फीच्या अंगावर साखळीचे वळ उठले आहेत. उर्फीने त्याचा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. यामध्ये उर्फीनं स्टाईलनंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या मानेवर साखळीचे वळ उठल्याचं दिसत आहे. हे पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.

उर्फीला तिच्या ड्रेसमुळे ट्रोल देखील करण्यात आलं होतं. साखळीनं स्टाईल केल्यानंतर उर्फीची ही अवस्था झाली आहे. तिच्या या अतरंगी फॅशन सेन्समुळे अनेकांना मोठा धक्काही बसला. या फॅशनमधून तिला नक्की काय सांगायचं हे समजलंही नाही. तर काहींनी तिला खूप ट्रोलही केलं आहे. 

उर्फीच्या मानेवरचे वळ फार भयंकर असल्याचं दिसत आहे. यावरून उर्फीची अवस्था काय झाली असेल ते दिसत आहे. तिच्या या अशा अवस्थेला तिची अजब स्टाईल जबाबदार असल्याचं दिसत आहे.