Urfi Javed angry on Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अमीषानं 'गदर 2' चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर काही आरोप केले होते म्हणून चर्चेत आली होती. आता अमीषानं ओटीटी कॉन्टेन्टवर वक्तव्य केलं होतं. अमीषा पटेलनं जे सांगितलं ते अनेकांच्या पसंतीस उतरलं नाही. यापैकी एक व्यक्ती ही नेहमीच विचित्र फॅशनमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेदही आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अडल्ट कॉन्टेन्टवर अमीषा पटेल जे काही म्हणाली त्यानं उर्फीला राग आल्याचे म्हटले जात आहे. तिनं अमीषाला सडेतोड उत्तर दिलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमीषा पटेल ओटीटीवर असलेल्या चित्रपटांविषयी बोलताना म्हणाली असे काही LGBTQ वर चित्रपट आहेत जे कुटुंबासोबत बसून बघू शकत नाही. ओटीटीवर लेस्बियन सीन्स, गे आणि होमोसेक्शुअल सीन्स मोठ्या प्रमाणात दाखवण्यात येतात. जे आपण कुटुंबासोबत पाहू शकत नाही. अमीषानं केलेलं हे वक्तव्य उर्फीच्या पसंतीस उतरलेलं नाही. या वक्तव्यावर उत्तर देत उर्फी जावेदनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अमीषाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात अमीषा ओटीटीवरील गे आणि सेल्बियन कंटेट विषयी बोलताना दिसते. व्हिडीओ शेअर करत उर्फी म्हणाली, हा समलैंहिकपणा काय असतो? तुमच्या मुलांना यापासून दूर ठेवा? याचा अर्थ जेव्हा तिनं म्हटलं होतं की 'कहो ना प्यार है' तर तिचं हे म्हणणं स्ट्रेट लोकांविषयी होतं. पब्लिक फिगर्स म्हणजे लोकप्रिय लोकांचे असे कोणत्याही संवेदनशील विषयावर काही माहितीन घेता बोलणं मला आवडलं नाही. मला याची राग आला. 25 वर्षांपासून काम मिळालं नाही तर खूप वाईट वृत्तीची व्यक्ती झाली.
उर्फीनं दिलेल्या या प्रतिक्रियेवर अमीषा आता काय उत्तर देईल याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तर अमीषानं नुकतीच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की लोक आता फक्त आता साधारण चित्रपट पाहायचे आहेत. तो काळ गेल्या जेव्हा त्यांना ते दोघं त्याची मुलं आणि आजी-आजोबा एकत्र येऊन चित्रपट पाहतात. ओटीटीवर तर हे मुळीच नाही. ओटीटीवर असे सीन्स आहेत जिथे तुम्हाला मुलांचे डोळे बंद करावे लागतात. एवढंच नाही तर काही लोक टीव्ही बंद करतात.
हेही वाचा : महेश मांजरेकरांना 'या' कारणासाठी आवडतं Salman Khan च्या घरचं जेवणं
गदर 2' विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटात अमीषा पटेल शिवाय उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि मनीष वाधवा आहेत. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.