व्हिडिओ: 'पृथ्वीवल्लभ' फेम आशीष शर्मा आणि सोनारिकाचा टीव्हीवर लिपलॉक किस

आजकाल टीव्हीचा छोटा पडदाही सिनेमाच्या भव्य पडद्यापेक्षा छोटा राहिला नाही. त्यामुळे सिनेमाच्या भव्य पडद्यावर दिसणारी दृश्ये टीव्हीच्या पडद्यावरही दिसू लागली आहेत.

Updated: May 14, 2018, 11:24 AM IST
व्हिडिओ: 'पृथ्वीवल्लभ' फेम आशीष शर्मा आणि सोनारिकाचा टीव्हीवर लिपलॉक किस title=

मुंबई : आजकाल टीव्हीचा छोटा पडदाही सिनेमाच्या भव्य पडद्यापेक्षा छोटा राहिला नाही. त्यामुळे सिनेमाच्या भव्य पडद्यावर दिसणारी दृश्ये टीव्हीच्या पडद्यावरही दिसू लागली आहेत. टीव्ही शो पृथ्वीवल्लभ सध्या प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करताना दिसत आहे. या शोमध्ये पृथ्वीवल्लभ स्टार आशीष आणि सोनारिका भदौरिया यांची सिजलिंग केमेस्ट्री प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार, आशीष आणि सोनारिया हे दोघेही छोट्या टीव्हीच्या पडद्यावर लिपलॉक किस करताना प्रेक्षकांना पहायला मिळतील. या शोमधील आशीष आणि सोनारिका यांच्या जोडीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

बाहुपाशातल्या मृणालला पृथ्वीने केला किस

सोनारिका आणि आशीषचे चाहते त्यांना खास पसंद करतात. स्टोरीलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, शोमध्ये मृनाल (सोनारिका) च्या मनात पृथ्वीबद्दल प्रेमळ भावना फुलायला लागल्या आहेत. पण, ती आपल्या भावना पृथ्वीसमोर व्यक्त करत नाही. दरम्यान, मृणालचा भाऊ राजा तिलपत त्याच्या लोकांना आदेश देतो की, पृथ्वीला ठार करा. शोमधील या घडामोडी सांगणारा प्रोमो नुकताच प्रसिद्ध झाला आहे. चॅनलने प्रसारित केलेल्या प्रोमोमध्ये मृनाल पृथ्वीच्या बाहुपाशात असल्याचे पहायला मिळते. तसेच, बाहुपाशातल्या मृणालला पृथ्वी पॅशिनेट किस करतानाही दिसतो.

... पण हा लिपलॉक किस नाही

दरम्यान, मृनाल आणि पृथ्वी यांच्यात सीक्वेंस अशा तऱ्हेने शूट करण्यात आला आहे की, समोरून पाहणाराला वाटते की, हे दोघे लिपलॉक किस करत आहे. पण, वास्तवात तसे काहीच नाही. अर्थात अशा प्रकारचे सीन टीव्हीच्या पडद्यावर प्रेक्षकांनी यापूर्वीही पाहिले आहेत.