सनी म्हणाली, 'चित्रपटात काम करेन पण, आधी मेडिकल रिपोर्ट दाखवा'

अभिनेत्री सनी लियॉनने जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा, अनेकांनी नाके मुरडली. पण, काळ हे सर्व गोष्टींवरील जालीम औषध. सनीला बॉलिवूडने स्विकारले! नव्हे, सनीने बॉलिवूडमध्ये आपली खास जागाही बनवली.

Updated: May 14, 2018, 10:41 AM IST
सनी म्हणाली, 'चित्रपटात काम करेन पण, आधी मेडिकल रिपोर्ट दाखवा' title=

मुंबई: अभिनेत्री सनी लियॉनने जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा, अनेकांनी नाके मुरडली. आता ही बया ईथं येऊन काय करणार असाच काहीसा या मंडळींचा रोख होता. पण, काळ हे सर्व गोष्टींवरील जालीम औषध. सनीला बॉलिवूडने स्विकारले! नव्हे, सनीने बॉलिवूडमध्ये आपली खास जागाही बनवली. आतापर्यंत तीने बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटांत कामे केली आहेत आणि आयटम साँगही केले आहेत. त्यामुळे बॉलिवूडमधील तिची कामगिरी पाहून तिचा खास असा चाहता वर्गही निर्माण झाला. पण, तुम्हाला माहिती आहे का? कॅमेऱ्यासमोर काम करतानाही सनी आपल्या प्रकृतीबद्धल नेहमीच दक्ष असते. सनीने जेव्हा महेश भट्टची फिल्म जिस्म-२ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटात सनी अभिनेता रणदीप हुड्डासोबत काम करणार होती. प्रसारमाध्यमांनी त्या वेळी दिलेल्या वृत्तानुसार, सनी चित्रपटात काम करायला तयार झाली पण, तिने निर्मात्यासमोर एक विचित्र अट ठेवली होती आणि ती त्यावर ठाम होती.

सहकलाकार तंदुरूस्त हवा

'जिस्म-२'मध्ये एकापेक्षा एक असे अत्यंत हॉट आणि इंटिमेट सीन असणार होते. चित्रपटाचे कथानक आणि कथानकाची गरज समजून घेतल्यावर सनीने सांगितले की, हे सीन देण्यासाठी मी तयार आहे. पण, त्यासाठी रणदीपचे मेडीकल सर्टिफिकेट्स मला पहावे लागतील. इतकेच नव्हे तर, सनीने अरूणोदय सिंहचेही मेडिकल सर्टिफिकेट मागितले होते. ही सर्टीफिकेट्स मागण्यापाठीमागे सनीचा इतकाच हेतू होता की, आपण ज्या अभिनेत्यासोबत काम करणार आहोत तो प्रकृतीने तंदुरूस्त असावा. त्याला कोणत्याही प्रकारचा असाध्य रोग नसावा. खास करून, एचआयव्ही वैगेरे.

सनीच्या नवऱ्याने केले वृत्ताचे खंडण

दरम्यान, सनीचा पती डेनियल वेबर याने अशा प्रकारच्या वृत्ताचे नेहमीच खंडण केले आहे. त्याने म्हटले होते की, असे काहीच नाही. चित्रपटाबाबत करार झाला तेव्हा अशी कुठल्याही प्रकारची बोलणी झाली नाहीत.

सनीचे चित्रपट

दरम्यान, सनीने आतापर्यंत जिस्म-२, लीला एक पहेली, हेट स्टोरी २, रागिनी एमएमएस २, जॅकपॉट, बलविंदर सिंह फेमस हो गया, शूटआऊट एट वडाळा, वन नाईट स्टँड, रईस, सिंह इज ब्लिंग, नूर यांसारख्या चित्रपटातूनही सनी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

दरम्यान, काल (१३ मे) सनीने आपला वाढदिवस साजरा केला. तीने यंदा वयाच्या ३६व्या वर्षात पदार्पण केले.