व्हिडिओ : स्पृहा-गश्मीरला 'काहीच प्रॉब्लेम नाही' पण...

अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता गश्मीर महाजनी ही एक फ्रेश जोडी 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतेय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. 

Updated: Jul 25, 2017, 03:44 PM IST
व्हिडिओ : स्पृहा-गश्मीरला 'काहीच प्रॉब्लेम नाही' पण...  title=

मुंबई : अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता गश्मीर महाजनी ही एक फ्रेश जोडी 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतेय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. 

या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय समीर विद्वांस यांनी... लग्नानंतर काही वर्षांनीच एकमेकांपासून मनानं दूर गेलेल्या, एकमेकांना वेळ न देऊ शकणाऱ्या एका जोडप्याची ही कथा असल्याचं ट्रेलरवरून दिसतंय.   

स्पृहा आणि गश्मीरसोबत या सिनेमात कमलेश सावंत, सीमा देशमुख, मास्टर आरश गोडबोले, करण भोसले आणि पटकथा संवाद लेखक कौस्तुभ सावरकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.