चेहरा फुलवण्यासाठी 'या' लोकप्रिय अभिनेत्रींनी केली महागातील महाग सर्जरी!

कधी तिरक नाक तर कधी ओठं अशा चेहऱ्यावरील भागांना पुर्णपणे बदलण्याचा हट्टहास अभिनेत्रींनी केला आहे. 

Updated: Oct 5, 2022, 04:12 PM IST
चेहरा फुलवण्यासाठी 'या' लोकप्रिय अभिनेत्रींनी केली महागातील महाग सर्जरी! title=

Bollywood Actresses Plastic Surgery: बॉलीवूड हे ग्लॅमरच विश्व आहे. या क्षेत्रात कलाकारांवरती कायमच स्पॉट लाईट असतात. त्यांच्या चेहऱ्याला मेकअप आणि टचअपची सातत्यानं गरज भासते. कॅमऱ्याभोवतीच स्वतःला प्रेझेटं करावं लागत असल्यामुळे हे सेलिब्रेटी आपल्या चेहऱ्यावर अनेक प्रकारचे प्रयोग करताना दिसतात. आताही सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे त्याच अभिनेत्रींची ज्यांनी आपल्या नैसर्गिक सौंदर्याला नाकारून चेहऱ्याची प्लॅटिक सर्जरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आपला चेहरा फुलवण्यासाठी या अभिनेत्रींनी साधीसोप्पी नाही तर महागातील महाग सर्जरी करून घेतली आहे. (top bollywood actresses who did most expensive plastic surgery)

या नावांमध्ये प्रियंका चोप्रापासून जान्हवी कपूरपर्यंत अभिनेत्रींचा समावेश आहे. कधी तिरक नाक तर कधी ओठं अशा चेहऱ्यावरील भागांना पुर्णपणे बदलण्याचा हट्टहास अभिनेत्रींनी केला आहे. 

1. प्रियंका चोप्रा - अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही आज आंतरराष्ट्रीय पातळीवरची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2000 साली प्रियंका चोप्रानं मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता. त्यानंतर फारच कमी कालावधीत तिनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. प्रियंकाचा तेव्हा चेहरा अत्यंत वेगळा होता. आपल्या नाकामुळं प्रियंकानं आपल्या नाकाची आणि ओठाची प्लॅस्टिक सर्जरी करू घेतली होती. 

3. कतरिना कैफ - विकी कौशलची पत्नी आणि बॉलीवूडची लोकप्रिय स्टाईलिश अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या मोहक अदांनी सगळ्यांनाच घायळ करते. कतरिनाचं नैसर्गिक सौंदर्य हे सगळ्यांनाच मोहवतं परंतु आपल्या नाकाची कतरिना खूप आधी प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. 

4. वाणी कपूर - 'शुद्ध देसी रोमान्स' फेम वाणी कपूरवरनंही आपल्या चेहऱ्यावर सर्जरी करून घेतली आहे. तिच्या पहिल्याच चित्रपटानंतर तिनं आपली ही प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली होती. त्यामुळे तिचा हा नवा लुक पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. असं म्हटलं जातं की वाणीला अनेकदा तिच्या प्लॅस्टिक सर्जरीबद्दल विचारलं होतं परंतु तिनं ही गोष्ट मात्र स्विकारली नव्हती. 

5. अनुष्का शर्मा - विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं तिच्या ओठांवर शस्त्रक्रिया केली होती, तिच्या या शस्त्रक्रियेमुळे तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आपल्या सर्जरीबद्दल अनुष्कानंही जाहीरपणे सांगितलं होतं. 

6. शिल्पा शेट्टी - शिल्पा शेट्टीची प्लॅस्टिक सर्जरी कोणापासूनही लपून राहिली नाही. आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी शिल्पानं कॉस्मेटिक सर्जरीचा आधार घेतला होता. ज्याबद्दल तिनंही जाहीरपणे सांगितले होते. 

7. अदिती राव हैदरी - बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने आपले नाक थोडे पातळ आणि आकारात येण्यासाठी नाकाची सर्जरी केली होती. परंतु याबद्दल तिनं मौन पाळलं होत.

8. जान्हवी कपूर - श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिनं लहान वयातच आपल्या नाकाची प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. तिनं हे ट्रान्सफॉर्मेशनही उघडपणे दिसून आलं आहे.