प्रसिद्ध अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते थक्क

अभिनेत्रीने सर्वच मर्यादा ओलांडच्या, बीचवरचे फोटो पाहिलेत का तुम्ही? 

Updated: Oct 5, 2022, 04:12 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते थक्क  title=

मुंबई : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. असाच एक फोटो आता एका अभिनेत्रीचा व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोत आता अभिनेत्रीने बीचवर फोटोशूट केल्याचे दिसत आहे. या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर (priya prakash varrier) सोशल मीडियावर खुप अक्टीव्ह असते. सोशल मीडियावर ती फोटो आणि व्हिडिओ टाकून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच तिचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

फोटोत काय?
प्रिया प्रकाश (priya prakash varrier photo) सध्या बँकॉकमध्ये वेकेशन एन्जॉय करत आहे. या वेकेशनचे फोटो तिने इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, या फोटोंवर तिने कोणतेही कॅप्शन लिहिलेले नाही आणि फक्त इमोजी शेअर केले आहेत.

प्रिया प्रकाश वारियरच्या (priya prakash varrier) ताज्या फोटोमध्ये ती बोटीवर बसून सुंदर दृश्य पाहत असल्याचे दिसून येतेय. तर दुसऱ्या फोटोत ती समुद्रात डुबकी मारताना दिसत आहे. प्रिया प्रकाशचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. प्रियाच्या या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतो आहे. अनेक नेटकरी तिच्या या फोटोंवर हार्ट इमोजी शेअर करतायत, तर काही तिला सुपर बेबी म्हणतायत.  

प्रिया प्रकाशने (priya prakash varrier photo) मध्यंतरी तिच्या डोळ्याच्या हावभावाने संपूर्ण देशाला वेड लावलं होत. हा व्हिडिओ तिच्या 'ओरू अदार लव्ह' या मल्याळम चित्रपटातील 'माणिक्य मलाराया पूरवी' या गाण्यातला होता. या व्हिडीओमुळे प्रिया प्रकाश वारियर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली होती. 

दरम्यान प्रिया प्रकाश वारियरच्या (priya prakash varrier photo) कारकिर्दीबद्दल बोलायचे तर तिने 2021 मध्ये दोन तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. नितीनसोबतचा 'चेक' हा तिचा पहिला चित्रपट होता तर दुसरा चित्रपट तेजा सज्जासोबत 'इश्क'मध्ये ती दिसली होती.