Mission Impossible 7 साठी टॉम क्रुझनं घेतलं तब्बल इतके कोटी..., आकडा वाचून बसेल धक्का

Tom Cruise : लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझचा ‘मिशन इम्पॉसिबल 7’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. तर दुसरीकडे टॉम क्रुझनं या चित्रपटासाठी किती मानधन घेतले हे नेटकरी सर्च करत आहेत. चला तर जाणून घेऊया...

दिक्षा पाटील | Updated: Jul 15, 2023, 05:52 PM IST
Mission Impossible 7 साठी टॉम क्रुझनं घेतलं तब्बल इतके कोटी..., आकडा वाचून बसेल धक्का title=
(Photo Credit : Social Media)

Tom Cruise : हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता टॉम क्रुझचा ‘मिशन इम्पॉसिबल 7’ हा चित्रपट नुकताच म्हणजेच 12 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुर होते. टॉम क्रुझच्या प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे संपूर्ण नाव हे ‘मिशन: इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन’ आहे. या चित्रपटाच्या सगळ्याच गोष्टींची चर्चा सुरु आहे. त्यापैकी एक म्हणजे टॉम क्रुझनं या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं. टॉम क्रुझच्या मानधनाविषयी चक्क नेटकरी गूगलवर सर्च करताना दिसत आहेत. चला तर जाणून घेऊया टॉम क्रुझनं चित्रपटासाठी किती मानधन घेतलं ते जाणून घेऊया..,

टॉम क्रुझचा चित्रपट म्हटला की लगेच सगळ्यांसमोर एकच गोष्ट येते आणि ती म्हणजे अॅक्शन. टॉम क्रुझचे चित्रपट सुपरहिट असतात. तो चित्रपटांमध्ये अनेक धोकादायक स्टंट करताना दिसतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानं आजवर केलेल्या सगळ्यात धोकादायक स्टंट पेक्षा जास्त धोकादायक स्टंट त्यानं आता ‘मिशन इम्पॉसिबल 7’ या चित्रपटात केला आहे. दरम्यान, या चित्रपटासाठी मग टॉम क्रुझनं किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न अनेकांच्या समोर उपस्थित आहे. तर व्हरायटीच्या वृत्तानुसार, टॉम क्रुझनं ‘मिशन इम्पॉसिबल 7’ या चित्रपटासाठी त्यानं 12 ते 14 मिलियन डॉलर म्हणजे 98 ते 115 कोटींचं मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : "माझ्या गाडीचा पाठलाग सुरु केला अन् तेव्हा...", काजोलनं सांगितला पापाराजींचा 'तो' किस्सा

टॉम क्रुझनं जर इतकं मानधन घेतलं असेल तर इतका जबरदस्त चित्रपट बनवण्यासाठी किती मानधन लागलं असेल असा प्रश्न आता तुमच्या समोर नक्कीच असेल? तर ‘मिशन : इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन’ या चित्रपटासाठी आलेला एकूण खर्च हा 385 कोटी इतका आहे. तर हा चित्रपट बनवण्याआधी चित्रपटाच्या निर्मात्यांनी जो विचार केला होता त्याच्या हा 10 पट असल्याचे म्हटले जाते. तर या चित्रपटाची निर्मात्यांमध्ये एक नाव हे टॉम क्रुझचे आहे. तुम्ही बरोबर वाचलं आहे. टॉम क्रुझ या चित्रपटाचा निर्माता देखील आहे. या फ्रॅन्चायझी विषयी अनेक गोष्टी जाणून घेऊया. टॉम क्रुझनं आजवर ‘मिशन इम्पॉसिबल' च्या चित्रपटाच्या सगळ्या भागांसाठी जवळपास 100 मिलियन डॉलर म्हणजेच 822 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते.  तर 2018 साली प्रदर्शित झलेल्या ‘मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट’ या चित्रपटाला 190 मिलियन डॉलर म्हणजे एक हजार 562 कोटींचा खर्च आला होता. चित्रपटानं प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर आतापर्यंत एकूण 30.30 कोटींचा गल्ला केला आहे.