TMKOC : जेनिफरनंतर आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप, म्हणाली 'ते वाट पाहात होते'

Rita Reporter Tarak Mehta Ka Ooltah Chashma: 'तारक मेहता' या मालिकेतला वाद काही कमी होण्याचे नावंच घेत नाहीये; त्यामुळे आता या मालिकेतील एका नव्या वादाला पेव फुटले आहे. यावेळी रीटा रिपोर्टर ही भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं निर्माते असीद मोदी यांच्यावर आरोप केलेले आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 26, 2023, 04:27 PM IST
TMKOC : जेनिफरनंतर आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप, म्हणाली 'ते वाट पाहात होते' title=
tmkoc actor priya ahuja rajda puts allegations on producer asit modi says they were waiting her to quit

Tarak Mehta Ka Ooltah Chashma: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे अनेक चाहते आहेत त्यामुळे ही मालिका कायमच चर्चेत असते. सध्या या मालिकेतील अनेक कलाकार हे मालिका सोडून गेलेले आहेत त्यामुळे या मालिकेचीही बरीच चर्चा झाली होती. त्यातून या काही बाहेर पडलेल्या कलाकारांनी निर्माते असीद मोदी यांच्यावर अनेक आरोपही केले होते. काही दिवसांपुर्वीही अशाच एका अभिनेत्रीनं या मालिकेतील निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यातून आता या मालिकेतील अशाच एका कलाकाराला डच्चू देण्यात आला असून या अभिनेत्रीनं निर्माते असीद मोदी यांच्यावर आरोपप्रत्यारोप केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा आहे. यावेळी तिनं एका मुलाखतीतून अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 

ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीतून तिनं याविषयीचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, 'तारक मेहता' या मालिकेतून माझी रिप्लेसमेंट झाली आहे याबद्दल मला काहीच माहिती नव्हते. त्यांच्या टीममधल्या एकानंही मला हे सांगितलं नाही की आता यापुढे मी या मालिकेचा भाग नाही आहे. मी निर्माते असीद मोदी यांना 5 मे रोजी एक मेसेज केला होता ज्यात मी विचारलं होतं की या मालिकेचा भाग आहे की नाही परंतु या प्रश्नावर त्यांनी मला काहीही उत्तर दिलेले नव्हते. त्यातून त्यांना मी हेही सांगितले की गेल्या आठ महिन्यांपासून मी तुमच्याकडून काहीच ऐकले नव्हते. त्यातून तुम्ही माझ्या कुठल्याही मेसेजचे उत्तरही दिले नाहीत. मला एवढंच कळलं की 19-20 वेळा ऑडिशन घेतल्यानंतर रीटा रिपोर्टरसाठी त्यांनी एका नव्या अभिनेत्रीची निवड केली होती आणि 21 जूलै रोजी त्यांनी तिच्यासोबत शूटही संपन्न केले आहे. 

ती यावेळी निर्मात्यांच्या या वागण्याचा निषेध व्यक्त केला होता. त्यातून तिला प्रचंड दु:ख झाल्याचेही तिनं सांगितले. ही घटना आपल्यासाठी अत्यंत हृदयद्रावक असल्याचे तिने सांगितले होते. तिनं हेही कबूल केले के तिला असे वाटले होते की निर्माते तिला परत फोन करतील किंवा पुन्हा बोलावतील. ती म्हणाली की तिच्या पतीनं मालव राजदानं शो सोडल्यानंतर आपल्यालाही काढून टाकण्यात आले. तिनं असंही सांगितलं होतं निर्मात्यांना तिच्याकडून हे ऐकायचे होते की ती शो सोडते आहे आणि त्यातूनच ते मग तिच्याजागी दुसऱ्या स्टारला आणायचे होते. 

हेही वाचा -  सुबोध भावे आणि रामायणातील 'हा' दिग्गज अभिनेता येणार एकत्र, यामागे आहे 'हे' निमित्तं

प्रिया अहूजा राजदा ही अभिनेत्री तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून रिपोर्टर रीटाची भुमिका करत होती. त्याचबरोबर तिचे पती मालव राजदा हे या मालिकेचे दिग्दर्शक होते.