श्रीदेवी आणि बोनी कपूरमध्ये 'या'कारणामुळे व्हायची भांडणं

अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव आज रात्री १०-३० वाजता मुंबई विमानतळावर दुबई पोलिस घेऊन येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 27, 2018, 06:01 PM IST
 श्रीदेवी आणि बोनी कपूरमध्ये 'या'कारणामुळे व्हायची भांडणं  title=

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव आज रात्री १०-३० वाजता मुंबई विमानतळावर दुबई पोलिस घेऊन येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दुबई आणि मुंबई पोलीसांमध्ये कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण झाल्यावर दुबई पोलिस मुंबई विमानतळावरुनच दुबईला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कार्डियॅक अरेस्टमुळे श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात होते. पण श्रीदेवीच्या रक्तात अल्कोहोल सापडल्याचे अहवालातून समोर आलेय.

दोघांमध्ये भांडणं ?

दरम्यान तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक आठवणी पुन्हा आठवल्या जातायत. पती बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्यात विविध कारणांवरून खटके उडायचे असे वृत्त हाती आलेय. श्रीदेवीच्या चेहऱ्यावर २९ सर्जरी झाल्याचे म्हटले जाते. तिची लाईफस्टाईल उच्च दर्जाची होती. श्रीदेवीला लाखोंचा खर्च यायचा अशीही चर्चा होती. हे कारण त्यांच्या भांडणामागे असेल असेही एखाद्याला वाटेल. पण तसे नाही. बोनी कपूरचे श्रीदेवीवर खूप प्रेम होतं. पण यांच्या भांडणाची कारण थोडी वेगळीच होती. 

हे कारण 

बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर हे बऱ्याचदा दोघांच्या भांडणाचे कारण असायचे. बोनी आणि मोना कपूर यांनी भेटणं देखील श्रीदेवीला सहन व्हायच नाही असेही वृत्त येतय. 

जाणकारांची चर्चा खरी असेल तर मोना कपूरच्या अंतिम दर्शनालाही  श्रीदेवीने आपल्या मुलींना पाठवलं नाही.

सत्ती शोरींशी वैर 

बोनी आणि श्रीदेवीचं अफेयर सुरू झाल्यानंतर मोना कपूरची आई सत्ती शौरीमध्ये वैर सुरू झालं. कधीकाळी मोना आणि श्रीदेवी या चांगल्या मैत्रिणी होत्या. पण बोनी सोबतच्या विवाहानंतर सर्वच बिघडल ते कायमचं. 

यावरून दोघांमध्ये वाद?

बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मोना कपूर होतं. त्यांना मुलगा अर्जुन कपूर आणि मुलगी अंशुला अशी दोन अपत्ये आहेत.

बोनी आणि श्रीदेवीच्या लग्नाने कपूर खानदानात खळबळ उडाली होती. मीडिया रिपोर्टनुसार अर्जुन कपूर आणि श्रीदेवी यांच्यात संपत्तीवरून वाद होत होते.

नातं अस्तित्वात नाही 

आमची गाठभेट कधी होतं नाही. आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवत नाही. त्यामुळे आमचं नातं अस्तित्वात नाही असं अर्जुन कपूर यानं म्हटलं होतं. 

कोणाचा अपमान करु नये अशी शिकवण मला माझ्या आईने दिल्याचेही अर्जुनने म्हटले होते.