'कभी खुशी कभी गम' सिनेमातील ही अभिनेत्री आज अशी दिसते...

'कभी खुशी कभी गम' या सिनेमात करीना कपूरच्या लहानपणीची भूमिका निभावणारी छोटी अभिनेत्री आठवतेय का तुम्हाला? उत्तर होय असेल तर हीच अभिनेत्री आज कशी दिसते, याचीही उत्सुकता तुम्हालाही असेल... 

Updated: Aug 25, 2017, 10:58 AM IST
'कभी खुशी कभी गम' सिनेमातील ही अभिनेत्री आज अशी दिसते...  title=

मुंबई : 'कभी खुशी कभी गम' या सिनेमात करीना कपूरच्या लहानपणीची भूमिका निभावणारी छोटी अभिनेत्री आठवतेय का तुम्हाला? उत्तर होय असेल तर हीच अभिनेत्री आज कशी दिसते, याचीही उत्सुकता तुम्हालाही असेल... 

ही भूमिका निभावली होती मालविका राज या बालकलाकारानं... मालविका आता मात्र 'बालकलाकार' राहिलेली नाही... लवकरच ती इमरान हाश्मीसोबत 'कॅप्टन नवाब' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. 


मालविका राज

खऱ्याखुऱ्या घटनांतून प्रेरणा घेऊन एका युद्धाच्या पार्श्वभूमीवर घटणारी घटना या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात पहिल्यांदाच इमरान एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

'मालविकाचे आम्ही अनेक ऑडिशन घेतले... तिनं प्रत्येक गोष्ट उत्कृष्टरित्या केली. तिनं बालकलाकार म्हणून काम केल्यानं या इंडस्ट्रीशी तिची ओळख आहेच... आणि तिचं कुटुंबही सिनेजगताशी जोडलेलं आहे' असं या सिनेमाचे दिग्दर्शक टोनी डिसूझा यांनी म्हटलंय.