श्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ वाढलेय, पार्थिव आज येण्याची शक्यता

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ तिसऱ्या दिवशीही वाढत चाललंय. श्रीदेवीचा बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला असला तरी त्याबाबतचं गूढ आणखी वाढलंय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 27, 2018, 08:16 AM IST
श्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ वाढलेय, पार्थिव आज येण्याची शक्यता title=

दुबई : प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ तिसऱ्या दिवशीही वाढत चाललंय. श्रीदेवीचा बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला असला तरी त्याबाबतचं गूढ आणखी वाढलंय. हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचं गुन्हेगारी मनोचिकित्सकांचं म्हणणं आहे.

 पार्थिव आज  मिळणार!

श्रीदेवीचे पार्थिव आज दिवसभरात येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दुबई पोलिसांनी हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. तसंच सीसीटीव्हीचा तपासही सुरू आहे. 

वकिलांच्या परवानगीशिवाय पार्थिव नाही!

श्रीदेवीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झालेलं असलं तरी सरकारी वकिलांच्या परवानगीशिवाय पार्थिव कुटुंबीयांकडे दिलं जाणार नाही.  त्यामुळे पोलीस सरकारी वकिलांच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहेत.  यासंदर्भात भारतीय दुतावासालाही दुबई पोलिसांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आता सरकारी वकिलांच्या निर्णयावर सारं काही अवलंबून आहे. तत्पूर्वी पोलिसांनी बोनी कपूर आणि खुशी कपूरचे जबाब नोंदवले.

शरीरात अल्कोहोलचा अंशही

श्रीदेवीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आलीय.  तसंच श्रीदेवीच्या शरीरात अल्कोहोलचा अंशही आढळल्याचं नमूद करण्यात आलंय. नशेत असलेल्या श्रीदेवीचा तोल गेल्यामुळे ती बाथटबमध्ये जाऊन पडल्यानं तिचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालात देण्यात आलीय.