The Kerala Story ची बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई; 12 दिवसात कमावले इतके कोटी रूपये

The Kerala Story Box Office Collection: The Kerala Story या चित्रपटानं गेल्या काहीच दिवसात चांगली कमाई केली असून या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. प्रदर्शित झाल्यापासून म्हणजेच गेल्या 12 दिवसात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चांगला गल्ला भरला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 17, 2023, 04:43 PM IST
The Kerala Story ची बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई; 12 दिवसात कमावले इतके कोटी रूपये  title=
फाईल फोटो

The Kerala Story Box Office Collection: 5 मे रोजी प्रदर्शित झालेला The Kerala Story हा चित्रपट प्रचंड विरोधानंतर प्रदर्शित झाला असून आता या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यावर्षी हा चित्रपट मोठ्या दिमाखात बॉक्स ऑफिसवर ओपन झाला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिस तगडी कमाई केली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 100 कोटी रूपये कमावले आहेत. त्यामुळे अल्पावधीच हा चित्रपट 100 करोड क्लबमध्ये आला आहे. या चित्रपटाची सुरूवातही चांगली राहिली असून आत्तापर्यंत या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद येताना दिसतो आहे. 12 दिवसात या चित्रपटानं जोरदार कमाई केली आहे. (the kerala story earns 150 crore in 12 days becomes fourth highest growing film in india)

मागील महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट बराच चर्चेत आला होता. त्यामुळे या चित्रपटाची सगळीकडेच तूफान चर्चा सुरू झाली होती. केरळ सरकारनं या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशातील काही राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्तही (Tax Free) करण्याचा निर्णय घेतला. अद्यापही या चित्रपटाल विरोध हा सुरूच आहे आणि सर्वोच्च न्यायालयातही या चित्रपटाची लढाई सुरूच आहे. 32,000 मळ्याळी मुलींचे धर्मपरिवर्तन करून त्यांना दहशतवादी संघटनेत नेल्याची कहाणी या चित्रपटातून मांडण्यात आल्याचा दावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुरूवातीला केला आहे. 

बॉक्स ऑफिस ट्रॅकर Sachnik या संकेतस्थळानूसार, The Kerala Story या चित्रपटानं गेल्या 12 दिवसात 156.69 कोटी रूपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बालानी यांच्या महत्त्वपूर्ण भुमिका आहेत. अदा शर्माच्या अभिनयाचेही या चित्रपटातील तिच्या भुमिकेसाठी तिचे कौतुक करण्यात आले आहे. या विकेंडपर्यंत हा चित्रपट 200 कोटी रूपयांची कमाई करू शकते असे चित्र दिसते आहे. 

हेही वाचा - ''काय परत तेच तेच...?'' लेकीसह Cannes ला रवाना झालेल्या ऐश्वर्याची फॅशन पाहून चाहते हैराण

पहिल्या आठवड्यातच या चित्रपटानं किसी का भाई किसी की जान या चित्रपटाला मागे सोडलं आणि 81.14 कोटी रूपयांची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं चांगला जोर धरला असून या चित्रपटाची कमाई ही 150 कोटीच्या वर पोहचली आहे. सध्या हा चित्रपट फारच चर्चेत असून आता या चित्रपटानं चांगली कमाई केल्याचे दिसून येते आहे. यावर बॉलिवूडमधून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. तर सोशल मीडियावरही या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे.