The Kerala Story collection Day 9: 'द केरला स्टोरी'नं बॉक्स ऑफिसवर केला 100 कोटींचा आकडा पार

The Kerala Story Box Office collection Day 9 : 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीचा वाद पाहता चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई करणार का असा सवाल अनेकांना होता अशात या चित्रपटानं सगळ्यांना उत्तर दिलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 14, 2023, 02:41 PM IST
The Kerala Story collection Day 9: 'द केरला स्टोरी'नं बॉक्स ऑफिसवर केला 100 कोटींचा आकडा पार title=
(Photo Credit : Social Media)

The Kerala Story Box Office collection Day 9 : 'द केरला स्टोरी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'द केरला स्टोरी' हा चित्रपट 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज नऊ दिवस झाले आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकूनही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना आहे. 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर नऊ दिवसात बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला केला आहे. आता चित्रपटानं 9 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेणार आहोत. 

द केरला स्टोरी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या ओपनिंगपासून चांगली कमाई करत आहे. चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये लोक गर्दी करत आहेत. एका आठवड्याच्या आत चित्रपटानं 50 कोटींचा आकडा पार केला होता, तर दहा दिवसाच्या आत चित्रपटानं 100 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपट समिषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी सांगितले आहे. चित्रपटानं शनिवारी बॉक्स ऑफिसवर खूप जबरदस्त कमाई केली आहे. शनिवारी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 19.50 कोटींचं कलेक्शन केलं. तर आतापर्यंत चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 112. 99 कोटींची कमाई केली आहे. तर लवकरच हा चित्रपट 150 कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर क्रॉस करण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, चित्रपटासाठी ही खूप चांगली वेळ आहे. कारण 9 जून रोजी शाहिद कपूरचा ब्लडी डॅडी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याआधी कोणताही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही आहे. त्यामुळे या काळात हा चित्रपट 200 कोटींचा गल्ला करू शकतो. पण अनेकांना आशा आहे की या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा गल्ला करायला हवा. 

हेही वाचा : अबब...! Urfi Javed गरजुंना चक्क दिल्या 500 रुपयांच्या नोटा, व्हिडीओ व्हायरल

द केरला स्टोरीनं चित्रपटा आधी यंदाच्या वर्षी काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली आहे. सगळ्यात आधी शाहरुख खानच्या 'पठाण' आणि रणबीर कपूरच्या 'तू झूठी मैं मक्कार' आणि सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटांनी कमाई केली आहे. 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची दिग्दर्शन सुदीप्तो सेननं केलं आहे. द केरला स्टोरी या चित्रपटात 4 मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे. तर या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धि इदनानी आणि सोनिया बलानी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.