मुंबई : 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने कब्जा करत आहे. या चित्रपटाचं 8 दिवसांचं कलेक्शन दमदार आहे. तर नवव्या दिवसाचं कलेक्शनही समोर आलं आहे. या चित्रपटाचं नवव्या दिवशीचं कलेक्शन पाहता रविवारी म्हणजे आज हा चित्रपट 150 कोटींचा टप्पा ओलांडणार असल्याचं स्पष्ट होत आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, 9व्या दिवशी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचं कलेक्शन 24.80 कोटी इतकं आहे. विशेष म्हणजे गेल्या 8 दिवसात या चित्रपटाचं कलेक्शन जेवढं झालं ते पाहता नवव्या दिवशी त्यापेक्षा जास्त आहे.
जाणून घ्या आत्तापर्यंतची कमाई
'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट 11 मार्चला प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्या दिवशी 3.55 कोटी, दुसऱ्या दिवशी 8.50 कोटी, तिसऱ्या दिवशी 15.10 कोटी, चौथ्या दिवशी 15.05 कोटी, पाचव्या दिवशी 18 कोटी, सहाव्या दिवशी 19.05 कोटी. सातव्या दिवशी 18.05 कोटी, आठव्या दिवशी 19.15 कोटी आणि नवव्या दिवशी 24.80 कोटी. अशा प्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत 141.25 कोटींची कमाई केली आहे.
#TheKashmirFiles joins the ranks of ALL TIME BLOCKBUSTERS [#Hindi films]… TRULY UNSTOPPABLE, REFUSES TO SLOW DOWN… Will cross cr today [#Holi]... Fri 3.55 cr, Sat 8.50 cr, Sun 15.10 cr, Mon 15.05 cr, Tue 18 cr, Wed 19.05 cr, Thu 18.05 cr. Total: ₹ 97.30 cr. #India biz. pic.twitter.com/Kzgd2SQDDN
— taran adarsh (@taran_adarsh) March 18, 2022
'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाने अनेक विक्रम नोंदवून इतिहास रचला आहे आणि सातत्याने नवे बेंचमार्क्स बनवत आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटात काश्मीरी पंडितांची दुर्दशा आणि 90 च्या दशकात त्यांना काश्मीरमधून स्थलांतर कसं करावं लागलं हे दाखवण्यात आलं आहे. या सिनेमात अनुपम खेर, चिन्मय मांडलेकर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटातील सगळ्या कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे.