'पैशांसाठी ललितच्या प्रेमात', प्रसिद्ध लेखीकेने साधला सुष्मितावर निशाणा

काही दिवसांपासून अभिनेत्री सुष्मिता सेन उद्योगपती ललित मोदीसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे.   

Updated: Jul 17, 2022, 11:46 AM IST
'पैशांसाठी ललितच्या प्रेमात', प्रसिद्ध लेखीकेने साधला सुष्मितावर निशाणा title=

मुंबई : प्रेमाला कोणतीही बंधनं नसतात, प्रेम ही फक्त एक भावना आहे, जी दोन व्यक्तींमध्ये असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सुष्मिता सेन उद्योगपती ललित मोदीसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. सुष्मिताने ललित मोदीसोबत असलेल्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. नवी सुरुवात केल्यामुळे अनेकांनी सुष्मिताला शुभेच्छा दिल्या, तर काहींनी मात्र तिव्र विरोध केला. प्रसिद्ध लेखीका तसलीमा नसरीन यांनी सुष्मितावर निशाणा साधला आहे. 

तसलीमा नसरीन म्हणाल्या, 'कोलकाता विमानतळावर मी सुष्मिता सेनला एकदाच भेटले. तिने मला मिठी मारली आणि मी तुझ्यावर प्रेम करते असे म्हणाली. आम्ही गप्पा मारल्या मी तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत होते.'

'मला सुष्मिता सेनचं व्यक्तिमत्व सर्वात जास्त आवडलं. कारण लहान वयात तिने दोन मुली दत्तक घेतल्या. तिचा प्रामाणिकपणा, शौर्य, जागरूकता, स्वावलंबन कौतुकास्पद आहे.' असं देखील तसलीमा नसरीन म्हणाल्या. 

पुढे ललित मोदीसोबत असलेल्या नात्यावर निशाणा साधत नसरीन म्हणाल्या, 'अभिनेत्री केवळ पैशामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या संस्थापकाच्या प्रेमात असू शकते, सुष्मिता सेन एका गुन्हेगाराला डेट करत आहे, जो अजिबात आकर्षक नाही.'

त्या पुढे म्हणाल्या, 'ललित मोदी खूप श्रीमंत आहे? तो प्रेमात सुष्मिताच्या पडलाही असेल, पण ती ललित मोदींच्या प्रेमात आहे? यावर विश्वास ठेवणे माझ्यासाठी फार कठीण आहे.' पैशावर प्रेम करणाऱ्यांचा माझ्या नजरेत आदर नाही.. असं देखीत लेखीक तसलीमा नसरीन म्हणाल्या.