तू 33 ची रजनीकांत 72 वर्षांचे म्हणत प्रश्न विचारताच तमन्ना संतापून म्हणाली, "आम्ही स्क्रीनवर..."

Rajinikanth Tamannaah Bhatia New Controversy: मागील अनेक आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. तमन्ना लवकरच अभिनेता रजनिकांतबरोबर एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र आता यावरुन एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 1, 2023, 11:39 AM IST
तू 33 ची रजनीकांत 72 वर्षांचे म्हणत प्रश्न विचारताच तमन्ना संतापून म्हणाली, "आम्ही स्क्रीनवर..." title=
तमन्नाला यासंदर्भात एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला

Tamannaah Bhatia and Rajinikanth 39 years age difference: तमन्ना भाटिया सध्या विजय वर्माबरोबरच्या लव्ह अफेरमुळे चर्चेत आहे. नुकतीच तमन्ना 'कालकूट' या वेब सीरीजच्या प्रमोशनच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. दुसरीकडे तमन्नाचा 'जेलर' नावाचा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये रजनीकांत प्रमुख भूमिका साकारत आहेत. मात्र आता या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसंदर्भातील एका मुद्द्यावरुन नवीन वाद सुरु झाला आहे. हा वाद नेमका काय आहे जाणून घेऊयात.

नवीन वादाला फुटलं तोंड

तमन्ना भाटिया आणि रजनिकांत यांचा 'जेलर' चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार यांनी केलं आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी 250 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांनीही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. सध्या मात्र रजनीकांत आणि तमन्ना यांच्या जोडीमुळे नवीन वादाला आणि चर्चेला तोंड फुटलंय.

तमन्ना संतापली

'जेलर'मध्ये तमन्ना भाटिया रजनिकांत यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात बोलताना तमन्नाने आनंद व्यक्त केला होता. रजनीकांत हे 72 वर्षांचे आहेत. तर तमन्ना 33 वर्षांची आहे. या दोघांमध्ये तब्बल 39 वर्षांचं अंतर आहे. म्हणजेच रजनीकांत हे तमन्नापेक्षा दुप्पटीहून अधिक वयाचे आहेत. हाच मुद्दा आता अनेकांना खटकत असल्याचं दिसत आहे. वयातील या अंतराबद्दल मुलाखतीमध्ये तमन्नाकडेही विचारणा करण्यात आली होती. वयातील अंतरासंदर्भातील प्रश्नावर तमन्नाने संतापून अगदी फटकळ भाषेत उत्तर दिलं होतं. 'सर्वजण वयाचा विचार का करत आहेत? आमच्याकडे कलाकार म्हणून का पाहिलं जात नाही?' असे प्रतिप्रश्न तमन्नाने विचारले आहेत. "आम्ही स्क्रीनवर ज्या भूमिका साकारत आहोत त्या भूमिका पाहिल्या पाहिजेत," असं तमन्नाने म्हटलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sun Pictures (@sunpictures)

तमन्नाच्या पुढील चित्रपटातील हिरो 67 वर्षांचा

"वयाबद्दल बोलायचं झालं तर वयाची साठी ओलांडलेला टॉम क्रूझ आजही अॅक्शनपटांमध्ये दमदार कामगिरी करत आहे. मी स्वत: वय वाढल्यानंतर आता काही चित्रपटांमधील विशेष गाण्यांमध्ये करते तसा डान्स करु इच्छिते. वयाने काय फरक पडतो?" असं तमन्नाने या प्रश्नाला उत्तर देताना विचारलं. तमन्नाचा जन्म हा 21 डिसेंबर 1989 रोजी झाला आहे. तर रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी झाला आहे. तमन्ना 'जेलर'नंतर आता 'भोला शंकर' चित्रपटामध्येही झळकणार आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका चिरंजीवी साकारत आहेत. चिरंजीवी सुद्धा 67 वर्षांचे आहेत. म्हणजेच 'भोला शंकर'मधील प्रमुख अभिनेता आणि तमन्नामधील वयाचं अंतर 34 वर्षांचं आहे.