मुंबई : सैफ अली खान अलीकडे आपला आगामी चित्रपट शेफच्या प्रमोशनामध्ये फार व्यस्त आहे. खऱ्या आयुष्यात देखील सैफला वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड आहे.
सैफला चायनीज आणि स्पेगेटी बनवायला खूप आवडतं. तैमूर लवकरात लवकर मोठा होऊन त्याला वडील सैफ यांनी बनवलेले जेवण आवडावे, अशी सैफची इच्छा आहे. एका मुलाखतीत सैफ म्हणाला की, तैमूर अजून लहान असून त्याला त्याच्या वयानुसार जे खाणे गरजेचे आहे, ते दिले जाते.
परंतु, एक पदार्थ तैमूरच्या अगदी आवडीचा आहे. नासपती आणि गाजर मॅश करून तैमूरला दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे असतात. त्याचबरोबर सैफ ते सांगितले की, डाळीसोबत बटाटा मॅश करून दिल्यास तैमूर अत्यंत खुश होतो. त्याबरोबर सैफची ही जेवण बनवण्याच्या कलेच्या प्रेमात करिना असल्याची कबुली सैफने दिली.