Audi ते Mercedes, पाहा जेठालालपासून ते दयाबेनपर्यंत कोणाकडे सर्वात महागडी गाडी?

कोणत्या गाड्यांची आवड

Updated: Dec 17, 2021, 05:55 PM IST
 Audi ते Mercedes, पाहा जेठालालपासून ते दयाबेनपर्यंत कोणाकडे सर्वात महागडी गाडी? title=

मुंबई : 13 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये अनेक कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याचा प्रसार केला आहे. या कलाकारांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर शोच्या माध्यमातून मोठं स्थान निर्माण केलं आहे.

या मालिकेतील दिलीप जोशी, दिशा वाकनी, मुनमुन दत्ता, भव्य गांधी, अमित भट्ट या कलाकारांकडे कोणत्या गाड्यांचे कलेक्शन आहे. आणि त्यांना कोणत्या गाड्यांची आवड आहे याबाबत जाणून घेणार आहोत.

दिलीप जोशी : जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे लक्झरी कारचे शौकीन आहेत. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी Q7 सारखी लक्झरी कार समाविष्ट आहे. ज्याची किंमत सुमारे 80 लाख रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे टोयोटा इनोव्हा आहे ज्याची किंमत 14 लाख रुपये आहे.

दिशा वाकनी : शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशाला लक्झरी कारचीही आवड आहे. दिलीप जोशींप्रमाणे त्यांच्याकडेही 80 लाखांची ऑडी Q7 आहे. 
शैलेश लोढा: शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढाकडे एक नाही तर अनेक लक्झरी कार आहेत, ज्यात मर्सिडीज बेंझ जीएलएस ई क्लास, ऑडी क्यू 3 सारख्या कारचा समावेश आहे.

मुनमुन दत्ता: शोमध्ये बबिता जीची भूमिका साकारणाऱ्या मुनमुनकडे एक इनोव्हा क्रिस्टा आहे, ज्याची किंमत 23 लाख रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे 9 लाखांची स्विफ्ट डिझायर आहे.

भव्य गांधी: एकेकाळी टप्पूच्या भूमिकेतून प्रसिद्धी मिळवणाऱ्या अभिनेता भव्य गांधी तरुण वयातच एका आलिशान कारचा मालकही आहे. त्याच्याकडे ऑडी A4 आहे,ज्याची किंमत सुमारे 47 लाख रुपये आहे.