'Tarak Mehata....' फेम रिपोर्टर रिटाचा दिग्दर्शकासोबत रोमान्स; व्हिडिओ व्हायरल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील रिपोर्टर रिटा एका व्हिडिओमुळे तुफान चर्चेत

Updated: Aug 24, 2021, 08:02 AM IST
'Tarak Mehata....' फेम रिपोर्टर रिटाचा दिग्दर्शकासोबत रोमान्स; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका  'तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)'सर्वांच्या मनात घर केले आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना मालिका फार जवळची आहे. मालिकेतील सर्वचं कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्यातली एक व्यक्तीरेखा म्हणजे मालिकेत रिपोर्टरची भूमिका  साकारणारी रिता म्हणजे अभिनेत्री प्रिया आहूजा (Priya Ahuja). प्रियाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Ahuja | NewBornMommy (@priyaahujarajda)

प्रिया आहुजाचा सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मालिकेचा दिग्दर्शक मालव राजदासोबत प्रियाचा एक रोमान्टीक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. मालिकेचा दिग्दर्शक मालवसोबत प्रियाने लग्न केलं आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत प्रियाने कॅप्शनमध्ये 'तेरे यार बथेरे ने मेरा तुही ऐ बस यारा।'  असं लिहिलं आहे. 

दरम्यान, प्रिया प्रेग्नेंसीनंतर प्रिया मालिकेपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर मात्र ती कायम ऍक्टिव्ह असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मीडियावर फोटो आणि  व्हिडिओ शेअर करत असते. शिवाय ती पती आणि मुलासोबत फोटो शेअर करत असते. सध्या मातृत्व अनुभवत असलेली प्रिया मालिकेत पुन्हा कधी येणार असा प्रश्न तिचे चाहते विचारत आहेत.