मुंबई : ज्या मालिकेने प्रत्येकाला मैत्रीची खरी व्याख्या सांगितली ती मालिका म्हणजे 'दिल दोस्ती दुनियादारी'. मालिकेतून प्रेक्षकांना भरभरुन हसवणाऱ्या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री स्वानंदी टिकेकरच्या मामांचं निधन झालं आहे. खुद्द स्वानंदीने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचं दुःख चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
स्वानंदीने मामांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने दुःख व्यक्त केलं आहे. 'मला तुझी किती आठवण येईल हे मी सांगू शकत नाही. मी माझ्या सभोवतालचा सर्वात आनंदी व्यक्ती गमावला आहे.' सध्या स्वनंदीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
अभिनेत्री बद्दल सांगायचं झालं तर, स्वानंदी मराठी कला विश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजवर अनेक वेगवेगळ्या नाटक, मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली.
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेमुळे प्रकाशझोतात येणाऱ्या स्वानंदीने कधीही मागे वळून पाहिले नाही. स्वानंदी फक्त अभिनेत्री नसून गायिकाही आहे. स्वानंदीला तिच्या आईकडून गाण्याचा वारसा मिळाला आहे.