Rajinikanth Thalaivar 170: सुपरस्टार रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा, ‘Jai Bhim’ चित्रपटाशी आहे कनेक्शन

Rajinikanth Thalaivar 170 Film: साऊथचा सुपरस्टार रजनीकांत सध्या आपल्या करिअरमधील 169 वी फिल्म शूट करत आहे. यानंतर रजनीकांत 170 वा चित्रपट करणार असल्याची घोषणा केली. सध्या या चित्रपटाचे नाव Thalaivar 170 ठेवण्यात आले आहे.

Updated: Mar 2, 2023, 03:23 PM IST
Rajinikanth Thalaivar 170: सुपरस्टार रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा, ‘Jai Bhim’ चित्रपटाशी आहे कनेक्शन  title=
Superstar Rajinikanth's Thalaivar 170

Rajinikanth Thalaivar 170th Film: साऊथचा सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आपल्या थलाईव्हा (Thalaivar) स्टाइलमुळे देशभरात प्रसिद्ध आहेत. रजनीकांतने आपल्या सुपरहिट सिनेमे दिले आहेत. आतापर्यंत रजनीकांत यांनी त्यांच्या करिअरमध्ये 169 वा चित्रपट शूट केले आहेत. त्यानंतर आता रजीकांत लायका प्रॉडक्शनसोबत आणखी एक चित्रपट करण्यासाठी सज्ज असून या चित्रपटाचे नाव सध्या Thalaivar 170 असे ठेवण्यात आले आहे. 

Thalaivar 170  या चित्रपटाबाबत लायका प्रॉडक्शनने आज (2 मार्च) घोषणा केली. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी जय भीम (Jai Bhim ) फेम दिग्दर्शक टीजी ज्ञानवेल यांच्यावर सोपवण्यात आली. तर चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध देणार आहे. लायकाने अध्यक्ष सुभास्करन यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया हँडलवर ही बातमी ट्विट करून माहिती दिली. रजनीकांत सध्या त्यांची लेक ऐश्वर्याच्या ‘लाल सलाम’ (Lal Salam) या चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. 

वाचा: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेत जाण्यापूर्वी जाणून घ्या काय आहे महत्त्वाचा निर्णय! 

बस कंडक्टर होण्यापासून ते आता कॉलिवूडमधील टॉप स्टारच्या दर्जाचा आनंद घेण्यापर्यंत रजनीकांत यांचा प्रवास हा खूप चर्चेतला राहिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार रजनीकांत यांच्या करिअरमधील 170वा चित्रपट असणार आहे. शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शन जय भीमचे TJ Gnanavel करणार आहेत.

Superstar Rajinikanth's film 'Thalaivar 170' with TJ Gnanvel is official  now | Tamil Movie News - Times of India

ऐश्वर्या ही रजनीकांत यांची मोठी मुलगी असून, प्रसिद्ध चित्रपट निर्माती देखील आहे. यापूर्वी ती धनुषसोबत विभक्त झाल्यामुळे प्रचंड चर्चेत आल होती. ऐश्वर्याने कोरोना लॉकडाऊनच्या काळातच रजनीकांत यांना चित्रपटाची कल्पना सांगितली होती. यानंतर ऐश्वर्याने आपल्या डोक्यातील या कल्पनेचे स्क्रिप्टमध्ये रूपांतर केले आणि पटकथा वाचल्यानंतर रजनीकांत देखील लेकीच्या या कथानकाने प्रभावित झाले.