Naga Shaurya Viral Video : बऱ्याचवेळा आपण सोशल मीडियावर प्रेमी युगलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहता. काही व्हिडीओंमध्ये ते रोमॅंटिक अंदाजात अभिनय करताना दिसतात तर कधी कोणत्या चित्रपटाच्या डायलॉगवर लिप्सिंग करताना दिसतात. इतकंच काय तर बऱ्याचवेळा आपण पाहिले की अनेकदा बॉयफ्रेंड हा गर्लफ्रेंडला मारतानाचा व्हिडीओ समोर येतो. त्यानंतर नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत या सगळ्याचा विरोध करताना दिसतात. अशात नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, यावेळी व्हिडीओत दाक्षिणात्य अभिनेता नागा शौर्या (Naga Shaurya) दिसत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नागा शौर्याचा याच्याशी काय संबंध आहे. नागा शौर्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यावेळी त्यानं एका मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडला मारल्यानंतर माफी मागण्यास सांगितले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी नागा शौर्याची स्तुती केली आहे. (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीनं स्वत: च्या गर्लफ्रेंडला रस्त्यात मारहाण केली आणि याकडे नागा शौर्याचे लक्ष गेले. हे पाहता नागा शौर्या तिथेच थांबला आणि तो रागानं त्या व्यक्तीसोबत बोलताना दिसला. नागा शौर्य त्या व्यक्तीला ओरडत असताना तो तिथून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर काय नागा शौर्यानं त्याचा हात धरून ठेवला. मग नागा शौर्यानं त्या मुलाला गर्लफ्रेंडची माफी मागण्यास सांगताच माझी गर्लफ्रेंड आहे मी काहीही करेन असं म्हणतं स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत “तू तिला रस्त्यावर का मारलंस? ती तुझी गर्लफ्रेंड असू शकते, पण त्यामुळे तू तिच्यासोबत वाटेल तसं वागू शकत नाही. तिची माफी माग", असं नागा शौर्य रागाने त्या व्यक्तीशी बोलताना दिसत आहे.
నడిరోడ్డుపై యువతిని కొట్టినందుకు యంగ్ హీరో ఆ వ్యక్తిపై ఆగ్రహం.!#HERO #nagashaurya #humanity stopped young Man Beating Women On Road.#TollywoodActor young hero #nagashaurya felt like a real hero after witnessing an incdent happning bfore his eyes
#PhalanaAbbayiPhalanaAmmayi pic.twitter.com/1NqgnR3YWQ— Sunil Veer (@sunilveer08) February 28, 2023
हे सगळं प्रकरण रस्त्यावर सुरु असताना तिथे कोणीही थांबलं नाही तर फक्त नागा शौर्या थांबला. अनेक लोक नागा शौर्याला पाहताच तिथेच थांबले तर काही लोक गर्दी पाहून थांबले तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ हैद्राबादमधील आहे. सुरुवातीला नागा शौर्यालाही माहित नव्हते की त्या पुरुषानं त्या महिलेला का मारहाण केली. मात्र, नंतर विचारताच त्याला कळलं की ते दोघे गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड आहेत. नागा शौर्या त्या पुरुषाला ओरडत असताना त्या दोघांमध्ये सुरु झालेला वाद पाहता त्या व्यक्तीची गर्लफ्रेंड त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. (Girlfriend And Boyfriend Fight)
नागा शौर्यचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून एक नेटकरी म्हणाला, "हा खरा हीरो आहे." तर दुसरा नेटकरी म्हणाला, "हा फक्त चित्रपटात नाही तर खऱ्या आयुष्यातही हीरो आहे." तिसरा नेटकरी म्हणाला, "खूप दिवसांनंतर एक जागृक आणि चांगला नागरिक पाहिला." (Girlfriend And Boyfriend Viral Video)
हेही वाचा : Shah Rukh Khan ची पत्नी गौरी खानविरोधात FIR दाखल! काय आहे प्रकरण?
नाग शौर्यच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘बऱ्याच कालावधीनंतर एक चांगला नागरिक पाहिला,’असं एकाने लिहिलं आहे. तर ‘हा खरा हिरो आहे’, अशा शब्दांत इतर नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. मारहाण करणाऱ्या बॉयफ्रेंडची बाजू घेणाऱ्या त्या तरुणीवरही काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे.(Girlfriend And Boyfriend Fight Viral Video)
नागा शौर्या हा एक उत्तम अभिनेता तसेच लेखक आणि निर्माता म्हणून ओळखला जातो. 2011 मध्ये त्यांने क्रिकेट, गर्ल्स अँड बिअर या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'चंदामामा कथलू' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटातही नागा शौर्यानं काम केलं आहे. ‘ओ बेबी’ या चित्रपटात नागा शौर्य समांथा रुथ प्रभूसोबत मोठ्या पडद्यावर दिसला होता. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नागा शौर्याचा कृष्णा वृंदा विहारी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.